आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Solider Shashikant Pawar Funeral Ceremony In Dhule

शहीद शशिकांत पवार अनंतात विलीन, बेटावद येथे अंत्यसंस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- खान्देशपुत्र शहीद शशिकांत पवार यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) धुळे जिल्ह्यातील बेटावद येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार यांच्या दीड वर्षांच्या मुलाने त्यांना मुखाग्नी दिला. उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. पवार यांच्यासह 20 जवान यावेळी शहीद झाले होते.

अपघात इतका भीषण होता की, पवार यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे पवार यांच्या आई आणि मुलाच्या रक्ताचे नमुने उत्तराखंडमध्ये पाठवण्यात आले होते. त्यावरुन मृतदेहाची ओळख पटल्यानंतर आज सकाळी पार्थिव धुळ्यात आणण्यात आले होते.

परंतु जळगाव जिल्ह्यातील शहीद गणेश अहिरराव यांच्या मृतदेह अद्याप त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात मिळालेला नाही.

दरम्यान, भाविकांच्या बचावकार्यादरम्यान शहीद झालेल्या डॅरिल कॅस्टिलीनो यांचं पार्थिव आज मुंबईत आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (रविवारी) दुपारी 12 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कॅस्टिलीनो हे हवाई दलात विंग कमांडर म्हणून कार्यरत होते.