नंदूरबार जिल्हातील सारंगखेडा गावात घोड्यांचा बाजार भरवला जातो. या बाजारातील घोड्यांची किंमत मर्सिडीजपेक्षाही जास्त आहे. या बाजारात मंगळवारी 'चांदनी' नावाच्या घोडीने सर्व रेकॉर्ड ब्रेक केल्याचे सांगितले जाते. या चांदनीला 15 लाख रूपयांपेक्षा जास्त किंमत मिळाली आहे. बाजारामध्ये बाजारात चांदणीची चर्चा सर्वत्र होती.
सुकामेवा आणि तुप-रोटीचा खुराक-
चांदनी नावाच्या घोडीला रोज पाच किलो हरभ-यासोबत, तीन अंडी, तुप आणि सुकामेव्याचा खुराक दिला जातो. 'चांदणी'ची चमक कायम राहण्यासाठी तिला रोज शँपूने अंघोळ घातली जाते. यांनतर तेल लावून मालिश केली जाते. अवघं एक वर्ष वय असलेल्या चांदणी नावाच्या घोडीची उंची 65 इंच आहे.
पुढील स्लाईडवर पाहा सारंगखेड्यातील घोड्यांचा बाजार