आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक वसाहतीत 24 तास वीज गूल, 400 उद्योगांचे सुमारे 50 लाखांचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- औद्योगिकवसाहत परिसरात 24 तास वीज पुरवठा बंद झाल्यामुळे 400 उद्योगांचे 50 लाखांचे नुकसान झाले. ‘जी’ सेक्टर भागात सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मर शनिवारी मध्यरात्री नादुरुस्त झाला. त्यामुळे वसाहतीचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. सलग दुसऱ्या दिवशीही पुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे उद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे.
10 एमव्हीचा ट्रान्सफॉर्मर अचानक नादुरुस्त झाल्याने औद्योगिक वसाहतीतील 40 टक्के भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी वाजता या ट्रान्सफाॅर्मरच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र, ट्रान्सफॉर्मरमध्ये अनेक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने तो दुरुस्त झाला नाही. मात्र, ट्रान्सफॉर्मरमध्ये अनेक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने तो दुरुस्त झाला नाही. याबाबत उद्योजकांनी क्रॉम्प्टनकडे तक्रारी केल्या. दुपारी पाच एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतरही तो पुरेसा दाब उचलत नव्हता. अखेर अन्य सबस्टेशनमधील वीज घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत ट्रॉन्स्फार्मर बदलला जाईल असे क्रॉम्प्टनचे औद्योगिक वसाहत परिसराचे मुख्य अभियंता व्ही.बी.पाटील यांनी सांगितले.