आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेकपाेस्टवरील प्रक्रिया पारदर्शक करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यातील चेकपाेस्टवरील सर्व कार्यालयीन प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी शासन धाेरणात्मक निर्णय घेत अाहे. रावेर, मुक्ताईनगर चेकपाेस्टवरील गैरप्रकारासंदर्भात परिवहन अायुक्तांकडून माहिती घेऊ. तेथील प्रक्रिया अाॅनलाइन करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. 
 
‘दिव्य मराठी’ने महाराष्ट्र अाणि मध्य प्रदेशच्या सीमेवर मुक्ताईनगर अाणि रावेर तालुक्यातील चेकपाेस्टवर स्टिंग अाॅपरेशन करून गैरप्रकार उजेडात अाणला हाेता. त्यानंतर चेकपाेस्टवर चालणाऱ्या गैरप्रकारांना कायमस्वरूपी अाळा घालण्याचे अामचे प्रयत्न अाहेत. अधिकाऱ्यांनी त्यावर अाॅनलाइनच्या माध्यमातून उपाययाेजनेला प्रारंभ केला अाहे. जळगाव जिल्ह्यातील चेकपाेस्टवर सुरू असलेल्या गैरप्रकारांबाबत परिवहन अायुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा करणार अाहे. राज्यातील इतर चेकपाेस्टच्या संदर्भातदेखील त्यांच्याकडून माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे रावते यांनी सांगितले. 

यासंदर्भात उपप्रादेशिक अधिकारी जयंत पाटील यांच्यामार्फत चेकपाेस्टवरील गैरप्रकाराची चाैकशी करून परिवहन अायुक्तांना अहवाल पाठविला जाणार अाहे. अाता यासंदर्भात परिवहनमंत्री रावते यांनीदेखील दखल घेतली अाहे. 
बातम्या आणखी आहेत...