आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण काढल्यावरच रस्त्यांची कामे, पालिका प्रशासनाने घेतला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : शहरातील रस्त्यांची दुर्दशा लक्षात घेता महापालिकेच्या निधीतून असाे की शासकीय याेजनांमधून रस्त्यांसाठी हाेणारा खर्च हा भविष्यासाठी उपयाेगी ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. त्यामुळे ज्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार अाहेत, त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतरच रस्त्यांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. जर अतिक्रमण काढण्यास विराेध झाल्यास त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार नसल्याचा निर्णय मनपाने घेतला अाहे. 

शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली अाहे. रस्ते दुरुस्ती हाेत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड राेष अाहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून हाेणारी कामे ही दीर्घकाळ टिकणारी व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे.
 
यासंदर्भात अायुक्त जीवन साेनवणे यांनी शहर अभियंत्यांना एक अादेश नुकताच जारी केला अाहे. यात मनपा किंवा शासकीय अथवा याेजनांच्या निधीतून रस्त्यांची कामे करताना अगाेदर त्या रस्त्यांवरील सर्व अतिक्रमणे काढावीत.
 
त्यानंतरच रस्त्यांची कामे सुरू करावीत. यात गटारींवरील अतिक्रमणेदेखील काढावीत, असे अादेश दिले अाहेत. तसेच अतिक्रमण निघण्यास विलंब लागणार असेल किंवा विराेध होत असेल, तर त्या रस्त्याचे काम करू नये. जाेपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही ताेपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू नये, असे स्पष्ट अादेश दिले अाहेत. यामुळे रस्त्यांवरील अतिक्रमण निघून कामेही हाेणार अाहेत. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या​ रस्त्याचे काम सुरू 
कृषीउत्पन्न बाजार समितीच्या मागच्या बाजूला असलेल्या संताेषीमाता मंदिराच्या रस्त्याचे काम महापालिकेने सुरू केले अाहे. अायुक्त साेनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार सहायक अभियंता सुनील भाेळे यांनी कामाची पाहणी केली. या रस्त्याला २९ वर्षांनंतर पुन्हा डांबर लागत असल्याने परिसरातील नागरिकांनी अानंद व्यक्त केला. तसेच अायुक्तांचे अाभार मानत त्यांचा सत्कारही केला. अॅटलांटा कंपनीच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करण्यात अाली हाेती. त्यानंतर प्रथमच या रस्त्याचे काम हाेत असल्याचे सांगण्यात अाले. 
बातम्या आणखी आहेत...