आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निरंतर’ने दुखापतीवर मात केली अ‍ाणि परिक्षा दिली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- परीक्षेच्या एक दिवस आधी डोळ्याला झालेली गंभीर दुखापतीवर मात करत निरंतर राजेंद्र कुळकर्णी याने दहावीच्या परीक्षेत शाळेतून पहिला येऊन जिद्द पूर्ण केली. तो ला.ना. शाळेचा विद्यार्थी असून त्याने 97 टक्के गुण मिळवले आहेत. तो शाळेत पहिला तर जिल्ह्यातून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या वर्षभराच्या अभ्यासाचे हे यश असले तरी परीक्षेच्या एक दिवस आधी त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीवर मात करीत त्याने उरलेले चार पेपर दिले. डोळ्यावर काळा चष्मा चढवून परीक्षागृहात पेपर लिहित असताना त्याने दुखापतीकडे दुर्लक्ष केले. मनाची तयारी आणि हिमतीवर त्याने मिळवलेले हे यश खरोखरच वाखणण्याजोगे आहे.
अशी घडली होती घटना
18 मार्च रोजी निरंतरचा विज्ञानाचा पेपर होता. पेपरच्या एक दिवस आधी म्हणजेच 17 मार्च रोजी सकाळी तो घराच्या कपाउंडमध्ये खेळत असताना बेलाच्या झाडाची अणकुचिदार साल त्याच्या डाव्या डोळ्यात घुसली, रक्तस्त्राव सुरू झाला. पालकांनी त्याला तत्काळ डॉ. मुळीक यांच्या रुग्णालयात नेले. याचदिवशी सायंकाळी शस्त्रक्रिया करून त्याच्या डोळ्यातून सालीचा तुकडा काढण्यात आला. सकाळी पेपर होता, त्रास कमी होण्यासाठी डोळ्यावर काळा चष्मा चढवला व तशाच अवस्थेत त्याने विज्ञानाचा पेपर लिहिला, त्यानंतरच तीन पेपरही दिले.