आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आचारसंहिता भंगच्या तक्रारींची चौकशी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग होण्याच्या तक्रारीत आता वाढ होत चालली आहे. प्रशासनाकडे आतापर्यंत 7 तक्रारी दाखल झाल्या होत्या. हरिविठ्ठलनगर परिसरात नळजोडणीप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आल्याने या प्रकरणी कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


निवडणूककाळात कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता हरिविठ्ठलनगर परिसरात नळजोडणी दिल्याची तक्रार संतोष पाटील यांनी दिली होती. या तक्रारीच्या प्राथमिक चौकशीत कनेक्शन दिल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इतर प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये नवनाथ दारकुंडे यांनी अमोल सांगोरे यांच्या विरोधात प्रचारादरम्यान आश्वासने दिल्याची तक्रार दिली आहे. तसेच सीमा सारस्वत यांनी वॉर्डातील उमेदवारांनी मोठे प्रचार बॅनर लावल्याची तक्रार केली आहे. कैलास पाटील यांनी इतर पक्षाच्या उमेदवारांकडून विनापरवाना होर्डिंग्ज लावल्याची तक्रार दाखल केली आहे.