जळगाव- समाजातील प्रश्न आणि त्यावरील उपाय समाजापर्यंत पोहोचवण्याचे पर्यायाने समाजाला दिशा देण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केले जात आहे. यामध्ये काम करणार्या तरुणांनी सकारात्मक भूमिका ठेवून काम करावे, असे मत नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी व्यक्त केले.
उमवितील विद्यार्थी कल्याण व राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव सोहळा सोमवारी अधिसभा सभागृहात झाला. या वेळी कुलगुरू सुधीर मेर्शाम अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलिस अधीक्षक एस.जयकुमार, विद्यार्थी कल्याण सल्लागार समितीचे उपाध्यक्ष विष्णू भंगाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयामध्ये शिकत असताना अभ्यासासोबत व्यक्तिगत विकासासाठी इतर कलागुणांची आवश्यकता आहे. हे गुण रासेयोच्या माध्यमातून विकसित होत असतात. समाजातील असंख्य प्रश्न रासेयोमार्फ त ऐरणीवर आणले जातात. समाज आणि देशासाठी एकत्रितपणाची भावना या माध्यमातून निर्माण होते. आपण जे काम करतो, ते प्रामाणिकपणे करावे. सामाजिक एकोपा कायम ठेवावा. हा एकोपा कायम राहिला नाही; तर विकासाला खिळ बसेल, असे साळुंखे यांनी सांगितले. या वेळी विद्यार्थी कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देणार्या पोस्टरचे विमोचनही करण्यात आले. तसेच विविध स्पध्रेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रा.सत्यजित साळवे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुरेखा पालवे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. दिनेश पाटील यांनी आभार मानले.