आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वंदे मातरम’चा अपमान; 20 पैकी 15 संचालक शिक्षक, तरीही राष्ट्रगान म्हटले चुकीचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एकीकडे देशभरात ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावरून राष्ट्रभिमान जागवण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे रविवारी ग.स.च्या वार्षिक सभेत वंदे मातरमचा अपमान केल्याचा गंभीर प्रकार घडला. विरोधकांना बाेलू देण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी सहकार गटाकडून हे कृत्य करण्यात अाल्याचा अाराेप सभासदांनी केला. संस्थेच्या संचालक मंडळात २० पैकी १५ संचालक शिक्षक असतानाही ‘वंदे मातरम’ अपूर्ण चुकीचे म्हणण्यात अाले. सभेत राष्ट्रभक्ती जागवत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची शपथ घेणाऱ्या संचालकांकडून घडलेल्या कृतीचा सभासदांमध्ये संताप व्यक्त केला जात अाहे. 

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.साेसायटीची १०८वी सर्वसाधारण सभा रविवारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन तुकाराम बाेराेले हे हाेते. व्यासपीठावर व्हाइस चेअरमन महेश पाटील, गटनेते उदय पाटील यांच्यासह सुमारे ५० पेक्षा जास्त अाजी-माजी संचालक नेते उपस्थित हाेते. सुरुवातीला नगरसेवक कैलास साेनवणे यांनी संचालक सभासदांना चिनी वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन करत बहिष्कार घालण्याची शपथ दिली. प्रास्ताविक चेअरमन बाेराेले यांनी केले. संचालक अजबसिंग पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

व्यासपीठावरच धक्काबुक्की 
सभेलासुरुवात झाल्यानंतर सत्ताधारी सहकार गटाकडून एकेक विषय वाचायला सुरुवात झाली. समर्थकांनी अवाजवी मतदानाने मंजुरी दिली जात हाेती. दरम्यान, माजी अध्यक्ष मगन पाटील यांनी प्रत्येक विषयावर चर्चेची मागणी केली. त्या वेळी सहकार गटाने अाधी सर्व विषय मंजूर करून चर्चा करू, अशी घोषणा केली; परंतु मंजुरीपूर्वी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्याचा आग्रह धरला. या दरम्यान माईकची अाेढाताण केली. सत्ताधारी विरोधकांमध्ये व्यासपीठावरच यावरून धक्काबुक्की देखील झाली. त्यामुळे सभासदांनीदेखील व्यासपीठावर धाव घेतल्याने गोंधळ वाढला. यात सर्व १५ विषय मंजूर करून ग.स.च्या सभेची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात अाली. 

नफ्याची रक्कम फुगवल्याचा अाराेप 
माजीसंचालक मगन पाटील, शरद पाटील, वाल्मीक पाटील, राजेंद्र साळुंखे, व्ही. एम. पाटील यांनी सत्ताधाऱ्यांकडून सभासदांची दिशाभूल केली जात अाहे. नफा केवळ काेटी ६० लाख ७६ हजार रुपयांचा असताना त्यात फुगवटा दाखवून 

शिक्षक असूनही चुकले
ग.स.च्यासंचालक मंडळावरील २० पैकी १५ संचालक शिक्षक असतानाही ‘वंदे मारतम्’चा अपमान हाेणे दुर्दैवी असल्याच्या भावना सभासदांनी व्यक्त केल्या. ग.स.चे राजकारण करताना शिक्षक संचालकांना वंदे मातरम््चा विसर पडणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया सभागृहात उमटल्या. 

पोलिसांत तक्रार करणार 
वंदेमातरमबद्दल प्रत्येकाने अादर करणे गरजेचे असताना सभा अाटाेपण्याच्या हेतूने सत्ताधाऱ्यांनी थेट माईकवर ताबा मिळवला. संचालक सुनील निंबा पाटील यांनी माईकवरून ‘वंदे मातरम’ म्हणण्यास सुरुवात केली. त्यांच्या सुरात सूर मिसळत अन्य संचालकही वंदे मातरम म्हणू लागले; परंतु वंदे मातरम अपूर्ण चुकीचे म्हणत सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभासदांमध्ये अाेरड सुरू झाली. विरोधकांनी हा वंदे मातरमचा अपमान असल्याचे सांगत पोलिसांत तक्रार करणार असल्याचे सांगितले. 

केवळ २५% भरले सभागृह 
ग.स.चे३९ हजार सभासद असून प्रत्येकाला ५०० रुपये मीटिंग भत्ता देण्यात येत हाेता. यासाठी सभासदांनी रांगा लावल्या हाेत्या. सभा सकाळी ११ वाजता सुरू झाल्यानंतर विषयांवर चर्चा हाेणार असतानाही सभागृहाच्या बैठक व्यवस्थेच्या तुलनेत केवळ २५ टक्के सभासदांनी हजेरी लावली. त्यामुळे सभासदांनाही संस्थेत काय चालले अाहे, याबद्दल काहीही घेणे देणे नसल्याचे दिसले. विशेष म्हणजे व्यासपीठावरील महिला संचालिका वगळता सभागृहात एकही महिला हजर नसल्याचे दिसले. 
बातम्या आणखी आहेत...