आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इन्शुरन्स एजंटच्या नॅनोत ‘आरटीओ ऑफिस’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने एका इन्शुरन्स एजंटला अटक केली आहे. त्याच्या नॅनो गाडीतून दोन बॅगभर संशयास्पद कागदपत्रे आणि 10 शिक्क्यांसह एजंटला सायंकाळी 7 वाजता ताब्यात घेतले आहे. एलसीबच्या पथकाने शुक्रवारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून गौरव पी. मेहता (वय 32, रा. मोहननगर) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून कागदपत्रांनी भरलेल्या दोन बॅगा तसेच आरटीओ कन्सल्टंट, आयडीएल मोटार ड्रायव्हिंग स्कूल, पेट्रोल टू एलपीजी गॅस किट, मोटारवाहन कर सल्लागार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव, आरटीओ एनओसी, हायड्रो टेस्ट व्हॅलिडीटी, आरटीओ एनओसी अँड्रेस चेंज, हायपोथिकेशन कॅन्सलायझेशन असे एकूण 10 प्रकारचे शिक्के सापडले आहेत. या कारवाईत लॅपटॉप, मोबाइल, कलर प्रिंटर, टाटा नॅनो (एमएच- 19, एपी- 4811) जप्त करण्यात आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे, लीलाकांत महाले, सतीश गवळी, मीनल साखळीकर यांच्या पथकाने कारवाई केली.