आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interested Candidate Visit To Matoshree In Mumbai For Ticket

इच्छुकांशी "मातोश्री'वर सामूहिक चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भुसावळ विधानसभामतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळावी, यासाठी अॅड. राजेश झाल्टे, संजय ब्राह्मणे, प्रा. उत्तमराव सुरवाडे, प्रभाकर जाधव, डॉ. राजेश मानवतकर, दिलीप सुरवाडे, प्रा. मनोहर संदानशिव, सुकदेवराव निकम, अर्जुन सपकाळे, नितीन नंदवणे यांच्यासह १२ इच्छुकांनी रविवारी मुंबईतील ‘मातोश्री’वर हजेरी लावली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व इच्छुकांशी सामूहिकपणे चर्चा केली.

तत्पूर्वी उपनेते गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्क प्रमुख आर. ओ. पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ पाटील, भुसावळचे माजी आमदार दिलीप भोळे, तालुकाप्रमुख बापू महाजन, शहरप्रमुख अॅड. श्याम श्रीगोंदेकर, विलास मुळे, युवा सेनेचे चंद्रकांत शर्मा यांच्याशीही ठाकरे यांनी मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिक उमेदवार मिळण्याची शक्यता
भुसावळ मतदारसंघात गेल्या वेळच्या निवडणुकीत स्थानिक उमेदवारीचा मुद्दा प्रभावी ठरला होता. ही बाब डोळ्यासमोर ठेवून पक्षश्रेष्ठींकडून सावध पवित्रा घेतला जात आहे. डझनभर इच्छुकांपैकी कोणाला उमेदवारी मिळते हे अजूनही गुलदस्त्यात असल्याने शिवसैनिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.'

पाच दिवसांत नाव जाहीर होणार
^मातोश्रीवरील बैठकीत पक्षप्रमुखांनी आपला उमेदवार धनुष्यबाण असल्याचे सांगून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. उमेदवारीबाबत सामूहिक चर्चा करण्यात आली. कोणालाही शब्द मिळालेला नाही. येत्या पाच दिवसांत थेट उमेदवाराचे नाव जाहीर होईल. आर. ओ. पाटील, सहसंपर्कप्रमुख, शिवसेना