आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ.गेडाम यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती , धुळे न्यायालयात उलटतपासणीस सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - लॅपटॉपमध्ये हार्डडिस्क असते का? तुमच्या लॅपटॉपमधील नोट्स पोलिसांना दिल्या होत्या का? घरकुल घोटाळ्यातील अपहाराचा आकडा कळाला होता का? तत्कालीन उपायुक्त नीलेश सागर यांनी फिर्याद का दिली नाही? या सारख्या अनेक प्रश्नांची सरबत्ती जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यावर उलटतपासणीवेळी करण्यात आली.

जळगाव घरकुल घोटाळ्यातील डॉ. प्रवीण गेडाम यांची विशेष न्या. आर.आर.कदम यांच्या समक्ष शुक्रवारी उलटतपासणी झाली. या वेळी संशयित आरोपी राजा मयूर यांच्यावतीने अॅड. अविनाश भिडे यांनी डॉ. गेडाम यांची उलटतपासणी घेतली. त्यांनी डॉ. गेडाम यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर डॉ. गेडाम म्हणाले की, अॅड. नहार यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेऊन लॅपटॉपमध्ये नोंदणी टिप्पणी काढल्या होत्या. घरकुल प्रकरणाचे तथ्य माहीत असणाऱ्या जबाबदार व्यक्तीने फिर्याद देण्याचे उपायुक्त नीलेश सागर यांना सुचवले होते. त्यांनी फिर्याद दिली नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. तसेच २७ जानेवारी २००६चा अहवाल तयार करून तो कर्मचाऱ्यांमार्फत पोलिसांकडे पाठवला. पोलिसांनी हा अहवाल घेतला नाही. २७ जानेवारीच्या अहवालाच्या अाधारे गुन्हा दाखल झाला नाही. आॅक्टोबर २००५ रोजीचे खान्देश बिल्डर्सचे पत्र पोलिसांना दिले होते किंवा नाही, हे आठवत नाही. या पत्राचा उल्लेख फिर्यादीत केलेला नाही, अशी माहिती डाॅ. गेडाम यांनी दिली.

दाेषाराेप पत्र वाचले का?
पोलिसांनीअतिरिक्त जबाब नोंदवला होता का? दोषारोपपत्र आपण वाचले होते का? मनपाने लॅपटॉप स्वीकारल्यामुळे मुंबई नगर विकास विभागाला दिलेल्या पत्राची प्रत पोलिसांना दिली होती का?असे प्रश्न गेडामांना विचारली.
बातम्या आणखी आहेत...