आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीनाट्य: भाजपमध्य धुसफूस; नगरसेवकांचा राजीनाम्याचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव -विधानसभािनवडणुकीपासून भाजप महानगरात प्रचंड धुसफुस सुरू झाली आहे. जुन्यांना डावलून नव्यांना संधीदिली जात असल्याने नाराजीनाट्याला सुरुवात झाली आहे. स्थायी समिती सभापती निवडीपासून याला अधिकच रंग येऊ लागला आहे. आमदार तथा महानगरजिल्‍हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्या भूमिकेमुळे नगरसेवकांनी राजीनाम्याचा इशारा दिल्याने चर्चेला ऊत आला आहे.
मनपात ३५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजप, मनसे राष्ट्रवादीने एकत्र येत खाविआच्या ताब्यातून स्थायीतील सभापतिपद खेचून आणले. त्यामुळे एकीकडे चैतन्याचे वातावरण असताना भाजपत दुसरीकडे नाराजीनाट्य रंगत आहे. स्थायी समिती सदस्य निवडताना ज्यांनी आतापर्यंत पदे भोगली नाहीत, अशांना संधी देण्याच्या सूचना महसूलमंत्री एकनाथ खडसेंनीजिल्‍हाध्यक्ष भोळेना केल्या हाेत्या. त्यामुळे जयश्री पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा हाेती. परंतु, दाेघा जुन्यांना डावलून ज्याेती चव्हाण यांची निवड करत थेट सभापतिपदी संधी देण्यात आल्याने पक्षांतर्गतच नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे स्थायी सदस्य निवडताना एकमताने र्णय घेता, परस्पर ठरवण्यात आले. तसेच सभापती निवडीसाठी बैठक बाेलवणे किती उचित होते, यावर खल सुरू आहे.
जुन्यांना डावलून नव्यांना संधी
-जुन्यांनाडावलून नव्या चेहऱ्यांना संधीदिली गेली. एक नवा एक जुना घ्यायला हवा हाेता. सदस्यनिवड परस्पर करतात आणि सभापती निवडीला बाेलवले जाते. यामुळे नाराज असल्याने राजीनामा देण्याची तयारी केली हाेती.नितीनपाटील, माजीनगरसेवक.

इशारादिल्यानंतर मनधरणी
स्थायीसमितीत एकाही जुन्या सदस्याला संधी देता, नव्या चेहऱ्याला संधी िदल्याचे लक्षात येताच नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी थेट राजीनामा देण्याची मानसिकता तयार केली हाेती. परंतु गटनेते डाॅ. अश्विन साेनवणे, िवराेधी पक्षनेते वामनराव खडके, सुनील माळी, मनाेज काळे आदींनी पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केल्याने पक्षांतर्गत नाराजी स्पष्ट झाली आहे.