आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थेट -संवाद : ‘युवारंग’ चित्रपट प्रवेशाची पहिली पायरी - अभिनेत्री समिधा गुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव चित्रपट असो की मालिका, कोणताही अभिनय करताना भूमिका जगावी लागते. मला 'तुकाराम' चित्रपटातील बहिणाईंची भूमिकाही अशाच पद्धतीने जगावी लागली, असे ‘कमला’ मालिका फेम सिनेअभिनेत्री समिधा गुरू यांनी सांगितले. रविवारी एसएसबीटी महाविद्यालयात 'युवारंग' महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी अायाेजित पत्रकार परिषदेत अनुभव कथन केले. युवारंगसारखे युवक महाेत्सव हे चित्रपट क्षेत्रातील प्रवेशाची पहिली पायरी असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी साधलेला संवाद त्यांच्याच शब्दात...

>चित्रपट मालिका या दोघांचाही अनुभव वेगवेगळा आहे. मालिकांमध्ये काम करताना दाेन-तीन वर्षे ती एक भूमिका जगावी लागते. मालिकांमधून काम केल्यास प्रत्येक घरात पोहोचता येते.
>गेल्या काही काळात ड्रामॅटिक, व्हायलेन्स क्रिएट करणाऱ्या मालिका तयार झाल्या. आता मात्र इमोशनल क्रिएटिव्ह सिरियलस् आल्या आहेत. त्यामुळे कौटंुबिक वातावरण चांगले राहते. मालिकांमधून आपण काय घेतो, तेही महत्त्वाचे आहे. सकारात्मक घेणे आवश्यक आहे. त्यामुळे टीव्ही हा इडियट बॉक्स वाटणार नाही.
>'तुकाराम'या चित्रपटातील 'बहिणाई' हे पात्र निर्मळ आनंद देणार, सालस निरागस होते. त्या भूमिकेतून मला खूप ऊर्जा मिळाली. सकारात्मक विचार करण्याची सक्ती दिली. खूप शिकायला मिळाले.
>'युवारंग'सारख्यास्पर्धा रुपेरी पडद्यावर येण्याची बेसिक पायरी आहे. कलेची भूक असलेल्यांना कोणीही रोखू शकत नाही. कलावंतासाठी शासनस्तरावरही प्रयत्न सुरू आहेत. कलावंतांनी खूप शिकले पाहिजे. चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत.
>माझा या यशापर्यंत पोहोचण्याचा १० वर्षांचा खडतर प्रवास आहे. संधीची वाट पाहू नका, ती खणून काढा. पेशन्स, मेहनत, हार्ड वर्क प्रामाणिकपणा अंगी बाळगा.
>आयुष्यभर विद्यार्थी बनून आपले अस्तित्व निर्माण करा. नेहमी शिकत राहणारा माणूस नतमस्तक राहतो. त्यामुळे उत्साह कायम राहतो. कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे चांगली प्रगती करता येते.
बातम्या आणखी आहेत...