आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Invalid Road Inauguration Issue At Jalgaon, Divya Marathi

कार्यादेश नसताना रस्त्याच्या उद्घाटनाची घाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बोहरा गल्लीतील रस्त्यासाठी खासदार निधी मंजूर होताच कार्यादेशाची प्रतीक्षा न करता पालिका पदाधिकार्‍यांनी उद्घाटन केले. लगेच खडी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, कार्यादेश नसल्याने मक्तेदाराने काम थांबविले आहे. रस्ता होत नाही आणि खडी पडून असल्याने नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली.
बोहरा गल्ली ते रथचौक पर्यंतच्या रस्त्याचे काम 1996-97 च्या दरम्यान झाले होते. अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. स्थानिक नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या मागणीवरून खासदार ए.टी. पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी सुमारे 14 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. निधी उपलब्ध होताच प्रशासकीय यंत्रणेकडून निविदा प्रक्रिया केली. मात्र कार्यादेशाची प्रतीक्षा न करता 14 फेब्रुवारी रोजी खासदार पाटील, महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, सभागृह नेता रमेश जैन, विरोधी पक्षनेता वामन खडके यांच्यासह प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. मात्र, रस्त्यावरील खडी पडून असल्याने अडचणीचे ठरत आहे.