आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Invested Money In KBC Company; Admission To The Woman

केबीसी कंपनीत गुंतवले पैसे; महिलेने दिली कबुली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बखळजागा अापली असल्याचे सांगून शिवशक्ती काॅलनीतील नागरिकाची ११ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तालुका पाेलिसांनी अटक केलेल्या महिला अाराेपीने हे पैसे नाशिक येथील केबीसी कंपनीत गुंतवल्याची कबुली पाेलिसांना दिली अाहे. तिला गुरुवारी न्यायाधीश ए.एम.मानकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांनी एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली अाहे.

खाेटेनगर परिसरातील शिवशक्ती काॅलनीतील रहिवासी विजय प्रल्हाद पाटील यांना अतुल रामदास बाेराडे (रा.साळवा, ता.धरणगाव), ज्याेती रामदास बाेराडे अाणि सचिन हरीश कांबळे यांनी एरंडाेल शहरातील बखळ जागा स्वतची सांगून १६ लाख रुपयांना विकली हाेती. या व्यवहारात २० अाॅगस्ट २०१४ ते जून २०१५पर्यंत वेळाेवेळी १० लाख रुपये राेख अाणि लाख १४ हजारांचे दागिने दिले हाेते. मात्र, एक वर्षानंतरही जागा ताब्यात मिळत नसल्याने पाटील यांनी तिघांविराेधात तालुका पाेलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला हाेता.

याप्रकरणी तालुका पाेलिसांनी अतुलला अगाेदर अटक केली हाेती. सध्या ताे न्यायालयीन काेठडीत अाहे. तसेच या प्रकरणातील दुसरी अाराेपी ज्याेतीची पाेलिस काेठडी गुरुवारी संपली. तिला न्यायाधीश मानकर यांच्या न्यायालयात हजर केले हाेते. त्यांनी तिला एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली अाहे. फिर्यादी पाटील यांना तिसरा संशयित सचिन कांबळे याने लाखांचा म्हैसूर बंॅकेचा ज्याेतीने १० लाखांचा अायसीअायसीअाय बंॅकेचा धनादेश दिला हाेता. मात्र, ते दाेन्ही धनादेश दिलेल्या कालावधीत वटले नाहीत. सरकार पक्षातर्फे अॅड.राजेश गवई, तर अाराेपींतर्फे अॅड.एम.बी.शुक्ल यांनी काम पाहिले.

९० हजारांचे घेतले कर्ज
पाेलिसकाेठडीत असलेल्या ज्याेती बाेराडे िहने १८ अाॅगस्ट २०१४ राेजी शहरातील अायसीअायसीअाय बंॅकेत दागिने तारण ठेवून ९० हजारांचे कर्ज घेतल्याची कबुली दिली. तसेच देशभरात गाजत असलेल्या नाशिक येथील घाेटाळेबाज केबीसी कंपनीत पैशांची गुंतवणूक केल्याचीही कबुली दिली. त्यामुळे दागिने हस्तगत करण्यासाठी अाणि केबीसी कंपनीत खरेच गंुतवणूक केली अाहे काय? याची तपासणी करण्यासाठी अॅड.गवई यांनी पाेलिस काेठडीची मागणी केली हाेती.