आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेकपाेस्टवरील वजनकाट्यांमधील मापात पाप; चेकपाेस्ट कारवाईची माहिती वरिष्ठांना सादर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथे मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या चेकपाेस्टवरील वजनकाट्यांमधील मापात पाप हाेत असल्याचे अाढळून अाले अाहे. या पूर्वीच वजन काटे बंद केले आहेत. तसेच वजनमापे तपासणी विभागाने काट्यात तफावत अाढळून अाल्याने उर्वरित दाेन्ही काटेही बंद केले अाहेत. त्यामुळे आता वजनकाट्यांशिवाय चेकपाेस्टचे कामकाज सुरू अाहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी बुधवारी मुंबई कार्यालयातील वरिष्ठांशी भेट घेऊन चेकपाेस्टवरील कारवाईची माहिती दिली. 
 
मध्य प्रदेशातून कर्की येथील महाराष्ट्राच्या चेकपाेस्टवर असलेल्या ट्रकचालकाकडून गाडी अंडरलाेड दाखविण्यासाठी ट्रकचालकाकडे हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चेकपाेस्टचे व्यवस्थापक दत्तात्रय विसपुते अाणि पंटरविराेधात १७ फेब्रुवारी राेजी पाेलिसात तक्रार दाखल करण्यात अाली हाेती. वजनमापे विभागाने रावेर येथील निरीक्षक एस.अार. खैरनार, ए.व्ही. पाटील अाणि सी.डी.पालीवाल यांच्यासह पाेलिसांनी मंगळवारी चेकपाेस्टवर जाऊन सुरू असलेल्या दाेन्ही काट्यांची तपासणी केली. यात काट्यात गडबड असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वजनमापे तपासणी विभागाने दाेन्ही काटे बंद केले अाहेत. चेकपाेस्टवर पर्यायी वजनकाट्याची व्यवस्था नसल्याने सध्या माेजमाप करता वाहने साेडावी लागत अाहेत. 

यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी मंगळवारी चेकपाेस्टवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली हाेती. ते बुधवारी कार्यालयीन बैठकीसाठी मुंबईला गेले असून तेथे त्यांनी चेकपाेस्टवरील कारवाईबाबत वरिष्ठांना माहिती दिली. ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग अाॅपरेशननंतर ट्रकचालकांनी पुढाकार घेत चेकपाेस्टच्या गैरव्यवहाराबाबत पाेलिसात तक्रार दिली अाहे. या प्रकरणाची पाेलिसांसह परिवहन विभागामार्फत देखील चाैकशी करण्यात येत अाहे. 
 
राज्यपातळीवर निर्णय...... 
राज्यशासनाने राज्यातील सर्वच चेकपाेस्टवर इलेक्ट्राॅनिक ताेलकाटे बसवण्याचा ठेका गुजरातच्या सद‌्भावना या कंपनीला दिला अाहे. शासनाने ठेका दिलेला असल्याने कर्कीच्या चेकपाेस्टवरील कारवाईसंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबईत वरिष्ठांकडे संपूर्ण प्रकरणाची माहिती सादर केली अाहे. 
 
वजनकाट्यांच्या ठेक्याबाबत वरिष्ठ घेतील निर्णय....... 
वजन काटे तपासणीसंदर्भात प्रत्यक्ष चेकपोस्टवर जाऊन पाहणी केली अाहे. बैठकीसाठी मुंबईला अालाे असून चेकपाेस्टसंदर्भात वरिष्ठांना सर्व माहिती दिली अाहे. वजनकाट्यांचा ठेका राज्यस्तरीय असल्याने वरिष्ठच काय ताे निर्णय घेतील - जयंत पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, जळगाव. 
बातम्या आणखी आहेत...