आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान ही भविष्याची गुंतवणूक : जिल्हाधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेत भयमुक्त वातावरणातील निवडणुका आणि मतदाराचे मत, या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. तसेच मतदानाचा अधिकार असल्याने प्रत्येक मतदाराने आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून मतदान करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या सीईओ शीतल उगले, अप्पर पोलिस अधीक्षक एन.अंबिका, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी उपस्थित होते.
या वेळी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांच्या भाषणाची चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच तहसीलदार गोविंद शिंदे यांनी मतदान करण्याबाबत शपथ दिली. त्यानंतर नवीन मतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. या वेळी शीतल उगले व संजय कापडणीस यांनीही मार्गदर्शन केले. निवडणूक तहसीलदार हेमलता बढे यांनी आभार मानले.