आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पीएसआय १५ हजाराची लाच घेताना जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- जप्त करण्यात आलेले लाखांचे बियाणे मूळ मालकास परत देण्याच्या बदल्यात पोलिस हेडकॉन्स्टेबलकरवी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पोलिस उपनिरीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यांना मागच्या वर्षीच राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता.

बंगळुरूच्या फाइट्रोजन फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील लाख २५ हजार रुपये किमतीचे बियाणे चालक क्लिनरने परस्पर गायब करून ट्रक कन्नड घाटातील दरीत सोडून दिला होता. चाळीसगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कैलास खंबाट यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास होता. जप्त बियाणे परत करण्यासाठी त्यांनी ५० हजार मागितले होते. मात्र, १५ हजारात तडजोड झाली होती. हेडकॉन्स्टेबल राजेंद्र राठोड यांना ही लाच स्वीकारताना पकडण्यात आले.