आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrigation Scam: Action Take On Accused, Chitale Give Information

सिंचन घोटाळा : दोषींवर कारवाई सुरू, चितळे यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सिंचन घोटाळाप्रकरणी चितळे समितीने दिलेल्या अहवालानुसार जे अधिकारी दोषी आढळून आले आहेत, त्यांची चौकशी सुरू झाली आहे, अशी माहिती ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली.

चितळे हे जल-जन-अन्नसुरक्षा परिषदेसाठी शहरात होते. चौकशी समितीचे ते प्रमुख होते. त्यांना या घोटाळ्याविषयी विचारले असता ते म्हणाले, घोटाळा झाला किंवा नाही हा नंतरचा भाग आहे. आधी त्यातील अनियमितता शोधणे हा चौकशीचा प्रमुख हेतू होता आणि त्यात अनियमितता असल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. अहवालातून नियमांतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्या अहवालानुसार शासनाने कार्यवाही सुरू केलेली आहे. यात दोषी असतील, त्या अधिका-यांची चौकशी सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने पुढील कारवाई मंत्रालयस्तरावरून करण्यात येणार आहे. नागपूर येथील अधिवेशनात सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. मात्र, त्यांनी पुन्हा चौकशी करण्यासाठी नेमका कुठला संदर्भ घेतला याविषयी मला माहिती नाही, असेही ते म्हणाले.

नियमावलीच नाही...
पाटबंधारे विभागाची स्वतंत्र नियमावली पुस्तिकाच उपलब्ध नाही. तेथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीचाच वापर केला जातो. अनेक त्रुटी अहवालातून समोर आल्या आहेत. कायद्यातही त्रुटी राहू नये, यासाठी कायद्यात बदल करून कार्यपद्धतीत सुधारणा करावी.