आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrigularity In Water Supply In Dharangaon Taluka

धरणगाव तालुक्यात पाणीपुरवठा योजनांमध्ये गैरव्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव - धरणगाव तालुक्यातील सोनवद खुर्द, कल्याणे होळ व वाघळूद खुर्द या तीन गावांमधील पाणीपुरवठा योजनांमध्ये एकूण 58 लाख 65 हजार 910 रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी अखेर समितीचे अध्यक्ष, सचिव,पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

सोनवद खुर्द येथील ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय पाणीपुरवठा निधीत अपहार झाला. 11 डिसेंबर 2006 ते 31 डिसेंबर 2012 या काळात 13 लाख 75 हजार 132 रुपयांचा अपहार झाला. याप्रकरणी विजय रामदास पाटील व विजया सुनील पाटील (सोनवद खुर्द) तसेच योगेश शरद कोलगेकर, एस.डी.डहाके, तत्कालीन कार्यकारी अभियंता चंद्रकांत परशुराम वाघ यांचे विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघळूद खुर्द येथील ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय पाणीपुरवठा निधीत 17 फेब्रुवारी 2003 ते 17 जून 2011 या काळात 28 लाख 35 हजार 64 रुपयांचा अपहार झाला. याप्रकरणी हिरालाल छगन पाटील, सुभाष चंपालाल पाटील (रा. वाघळूद खुर्द), योगेश शरद कोलगेकर, एस.डी.डहाके, तत्कालीन कार्यकारी अभियंता चंद्रकांत परशुराम वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुभाष पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पी.सी.पाटील यांचे बंधू आहेत. तर हिरालाल पाटील हे चुलत बंधू आहेत.


तसेच कल्याणेहोळ येथील ग्रामपंचायत अंतर्गत शासकीय पाणीपुरवठा निधीत 1 जानेवारी 2007 ते 31 जानेवारी 2011 या काळात 16 लाख 55 हजार 744 रुपयांचा अपहार झाला. याप्रकरणी धरमसिंग पुंडलिक पाटील व रमेश राजाराम पाटील (रा.कल्याणेहोळ) तसेच योगेश शरद कोलगेकर, एस.डी.डहाके, तत्कालीन कार्यकारी अभियंता चंद्रकांत परशुराम वाघ यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश पाटील हे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत.
या योजनांसदर्भात प्रकरणी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. त्याची सुनावणी सोमवारी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे होणार आहे.