आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishwarlal Jain And Gulabrao Devkar Meet At Jalgoan

खासदार जैन, गुलाबराव देवकर यांचे मनोमिलन; चिमणराव पाटलांची मध्यस्थी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कट्टर विरोधक म्हटले जाणारे खासदार ईश्वरलाल जैन आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर सोमवारी जिल्हा बँकेच्या बैठकीनिमित्त एकत्र आले. आगामी निवडणुकांचा काळ लक्षात घेऊन त्या दोघांमधील तसेच आपल्याविषयीची नाराजी दूर करण्याची संधी म्हणून आमदार चिमणराव पाटील यांनी मध्यस्थी केली. त्यांच्याच बंद दालनात तिघांमध्ये चर्चा झाली.
राजकारणाच्या सोयीस्कर समीकरणांचे प्रतिबिंब असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदार देवकर आणि खासदार जैन यांची भेट संचालकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. कार्यकारी समितीची बैठक आटोपल्यावर इतर सदस्य निघून गेल्यानंतर चिमणराव पाटील यांच्या अँन्टी चेंबरमध्ये तिघांची बंदद्वार चर्चा झाली. याचवेळी तेथे ज्येष्ठ संचालक अँड.वसंतराव मोरे दाखल झाले. अध्यक्षांना भेटण्यासाठी त्यांनी बंदद्वार चर्चा संपण्याची वाट पाहिली. त्यांनी आत प्रवेश केल्यानंतर मात्र चर्चा थांबली. कोरमपूर्ती न होऊ देणारा आमदार देवकरांचा विरोध पाठिंब्यात परावर्तित करण्याची राजकीय किमया चिमणराव पाटलांनी केली होती. त्यानंतर ओढवलेली खासदार जैन यांची नाराजीही त्यांनी दूर केली होती. दोघा नाराजांना आणि राजकीय विरोधकांना एकत्र आणण्यामागे त्यांचेच प्रयत्न असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोघांमध्ये राजकीय समीकरणे आखली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.