आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishwarlal Jain News In Marathi, Raksha Khadse, BJP, Nationalist Congress

‘ईश्वरलाल जैन यांनी डिवचले म्हणून रक्षा खडसेंना उमेदवारी द्या’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘ईश्वरलाल जैन यांनी डिवचले म्हणून रक्षा खडसेंना उमेदवारी द्या,’ अशी मागणी करणे हा खडसेंचा नाटकीपणा आहे. जावळेंची नाराजी टाळण्यासाठी ते माझ्या नावाचा नाटकी वापर करीत आहे. सहा महिन्यांपासून उमेदवारीसाठी त्यांची तळमळ सार्‍यांनीच बघितली आहे. आता लेवा समाजाची मते तोडण्यासाठी ते माझ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. लेवा समाजाबद्दल मी चुकीचे बोललोच नाही. पातळी सोडून राजकारण करणार्‍या वक्तव्याला महत्त्व द्यावे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व नसले तरी समाजात गैरसमज पसरू नये म्हणून बोलावे लागत असल्याचे खासदार जैन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.


उमेदवारीसाठी खडसेंचे प्रयत्न म्हणजे ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार आहे.उमेदवारीसाठी सहा महिन्यांपासूनच ते प्रयत्नशील होते. सर्वच प्रयत्न करून त्यांनी शेवटी माझ्या नावाचा वापर करीत पक्षाची दिशाभूल केली. हरिभाऊ जावळे यांची नाराजी ओढवून घेऊ नये म्हणून त्यांनी मी आव्हान दिल्याचे भांडवल केल्याचा आरोप खासदार जैन यांनी केला. दरम्यान, उटसूठ त्यांना मनीष आणि मी दिसत असल्याने ते दररोज आम्हाला जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. यंत्रणेवर दबाव टाकून सीआयडीच्या गुप्त चौकशीचा अहवाल ते फोडत असल्याचा संशय असल्याचे जैन यावेळी म्हणाले.


खरे आव्हान का स्वीकारले नाही
विमानात गोपीनाथ मुंडे यांच्याशी बोलताना मी खडसे किंवा त्यांच्या कुटुबांतील अन्य कोणाला उमेदवारी देण्यासंदर्भात बोललो होतो. त्याचा उल्लेख मी राष्ट्रवादी कार्यालयात केला होता. त्यानंतर मनीष जैन यांनी एका मुलाखतीमध्ये ‘मी आमदारकीचा राजीनामा देऊन लढत असल्याने खडसेंनीसुद्धा पदाचा राजीनामा देऊन लढावे’ असे थेट आव्हान दिले होते. ते खडसे कसे विसरले. सोईस्कर भूमिका घेत त्यांनी त्यातून माघार घेतली. खरे आव्हान तर त्यांनी स्वीकारलेच नाही.