आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी पालिकेला पत्र प्राप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एकीकडे महापालिका बरखास्तीचे सावट असताना दोन महिने पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना आता आणखी तणावाचा सामना करावा लागणार आहे.
विमानतळप्रकरणी दाखल गुन्ह्यात अधिकाऱ्यांना जबाब देण्यासाठी हजर राहण्याचे पत्र पालिकेत दाखल झाले आहे. यात काही निवृत्त अधिकाऱ्यांच्या नावानेही समन्स निघाल्याने पुन्हा पोलिस ठाण्याच्या चकरा सुरू होणार आहेत.

घरकुल घोटाळाप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या जळगाव महापालिकेवर वाघूर पाणीपुरवठा योजना, अॅटलांटा, मोफत बससेवा योजना तसेच विमानतळाच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल अाहेत. यापैकी विमानतळाच्या गुन्ह्याच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी तत्कालिन नगरसेवकांना जबाब नोंदवण्यासाठी नोटीस देण्यात आल्या होत्या. लोकप्रतिनिधींपाठोपाठ योजनेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका राहिलेल्या तसेच प्रशासकीय कामकाजात सहभाग असलेल्या अधिकाऱ्यांचाही जबाब नोदवला जाणार आहे. त्या दृष्टीने अप्पर पोलिस अधीक्षक तथा तपास अधिकारी नंदकुमार ठाकूर यांनी १८ ऑगस्टच्या तारखेचे सीआरपीसी १६० प्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समन्स काढले आहेत.

उद्या अधीक्षक कार्यालयात जबाब
तपासाधिकाऱ्यांनीसंबंधित अधिकाऱ्यांना २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. विमानतळप्रकरणी दाखल फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात दाखल गुरनं ११० /२०१२ भादंवि ४०३,४०६,४०९, ४२०, ४६५, ४६८, ४७१,१२० (ब),३४, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३(१) (क), १३ (२) नुसार गुन्हा दाखल आहे.

या अधिकाऱ्यांना बजावले समन्स
डी.एस.खडके(तत्कालीन शहर अभियंता), प्रकाश पाटील (कनिष्ठ अभियंता), डी.आर.पाटील (कनिष्ठ लेखापरीक्षक), रमेश ओझा, दीपक आळंदे (लेखाधिकारी), व्ही.बी.सूर्यवंशी (उपअभियंता) यांना सीआरपीसी १६० प्रमाणे समन्स बजावण्यात आली आहे.