आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुत्र्यांना शहराबाहेर सोडणे पडणार महागात, महापालिका अधिकारी पुन्हा येणार अडचणीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माेकाट कुत्र्यांच्या त्रासातूून मुक्तीसाठी त्यांना पकडून शहराबाहेर साेडणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना महागात पडणार अाहे. न्यायालयाच्या अादेशाचा अवमान केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध पाेेलिसांत गुन्हा दाखल हाेण्याची शक्यता अाहे. अॅनिमल वेलफेअर बाेेर्डाच्या निर्देशानुसार फाइट फाॅर अॅनिमल या संस्थेच्या माध्यमातून तक्रार देण्यात येणार असल्याचे मनाेज शर्मा यांनी सांगितले.

शहरात सध्या माेकाट कुत्र्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत अाहे. वृद्ध लहान मुले मुख्य टार्गेट असलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा म्हणून निर्बीजीकरणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया

कायद्यातील तरतुदींची माहिती घेतल्यानंतर महापालिकेने माेकाट कुत्र्यांना पकडून शहराबाहेर साेडण्याची प्रक्रिया बंद केली अाहे. तसेच कुत्र्यांचे लसीकरण निर्बीजीकरणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया नव्याने राबवणार अाहाेत. डाॅ.विकास पाटील, अाराेग्याधिकारी.
बातम्या आणखी आहेत...