आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तांना धक्काबुक्की,गढूळ पाण्यावरून रणकंदन- अायुक्त घटाघटा प्याले गढूळ पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्चेकरी महिलांना जिन्यातच अडवताना पोलिस अिधकारी. - Divya Marathi
मोर्चेकरी महिलांना जिन्यातच अडवताना पोलिस अिधकारी.
धुळे- महापालिकेच्या इतिहासाला काळिमा फासणारी घटना बुधवारी घडली. महासभा सुरू असताना गढूळ पाण्यावरून अाक्रमक झालेला जमाव थेट सभेत घुसला. संतप्त महिलांच्या या जमावाने डायसभाेवती घेराव घातला. अायुक्त महापाैर या घेरावात सापडले. महिलांचा अाक्रमकपणा इतका हाेता की, या वेळी अायुक्तांना धक्काबुक्की झाली. वातावरण पेटायला लागल्याचे पाहताच अायुक्त डाॅ. नामदेव भाेसले यांनी सभागृहाबाहेर पळ काढला. त्याचवेळी महापालिकेच्या जिन्यात त्यांना काही तरुणांनी अाणखी धक्काबुक्की केली. मारहाणीचा प्रकारही घडला. मात्र, डाॅ. भाेसले जाेरात पळत निघाल्याने त्यांना घेरलेल्या घाेळक्यातून सहीसलामत निघता अाले.
या घटनेमुळे महापालिकेचे वातावरण सकाळी ११ वाजेपासून दुपारी वाजेपर्यंत तणावपूर्ण हाेते. महापालिकेच्या अावारात पाेलिसांचा कडक बंदाेबस्त लावण्यात अाला. एकीकडे अाक्रमक अांदाेलक तर दुसरीकडे पाेलिसांची तुकडी असा प्रकार दिसून अाला. दरम्यान ज्या गढूळ पाण्यावरून हा प्रकार घडला, ते पाणी सर्व सभागृहाच्या साक्षीने अायुक्त डाॅ. भाेसले यांनी घटाघटा पिऊन दाखवले. त्याचबराेबर नगरसेवक माया परदेशी यांनी पाण्यावरून केलेल्या राजकारणाचाही पर्दाफाश केला. महासभा सुरू हाेण्यापूर्वी प्रभाग क्रमांक २१ मध्ये दीड वर्षांपासून दूषित पाणी येत असल्याची तक्रार घेऊन महादेवपुरा, सहाव्या गल्ली भागातील नागरिकांचा मोर्चा नगरसेविका माया परदेशी यांच्यासह अाला. माेठ्या संख्येने माेर्चेकरी मनपा अावारात जमले हाेते. सभा सुरू हाेताच या माेर्चेकऱ्यांमध्ये असलेल्या महिलांनी थेट सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर आयुक्तांच्या डायससमोर जाऊन त्यांना घेराव घातला. त्यांच्या हातात गढूळ पाण्याची बाटली दिली. महिलांची गर्दी वाढत असल्याचे पाहून आयुक्त डाॅ. भाेसले यांनी तत्काळ सभात्याग करीत सभागृहाबाहेर पळ काढला. माया परदेशी यांच्या वाॅर्डात काल मंगळवारपासून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले हाेते. तरीही नागरिकांचा माेर्चा अाला. पोलिसांना जुमानता माेर्चेकरी मनपा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहातच घुसले. या वेळी आयुक्त डाॅ. भाेसले यांनी महापौर जयश्री अहिरराव यांना माेर्चेकऱ्यांना सभागृहाबाहेर थांबायला लावा, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही कृती झाली नाही. त्यामुळे आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनाच सभात्याग करावा लागला. त्यानंतर माेर्चातील नागरिकांनी मनपा आवारात अायुक्तांच्या विरोधात जाेरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आयुक्तांच्या दालनाकडे जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना खालीच अडविले. त्यामुळे आवारातच मोर्चेकऱ्यांनी तळ ठोकला. दुपारी दोन वाजेपर्यंत ही स्थिती होती.

पूर्वनियोजित कट
सहाव्यागल्ली भागात पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे. तरीही नागरिकांचा मोर्चा कसा काय आला. त्याचप्रमाणे मागील मोर्चा प्रवेशद्वारावरच अडविला असताना या वेळी मोर्चेकरी थेट सभागृहात कसे पोहाेचले धक्काबुक्की केली. हा पूर्वनियोजित कट वाटत असल्याचे अिधकाऱ्यांनी सांगितले. त्यातून सभागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते.

बैसाणे अग्रवाल बाॅडीगार्ड
अायुक्त भाेसले यांना जिन्यात काही तरुणांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अतिक्रमण पथकाचे विभागप्रमुख नंदकुमार बैसाणे स्वीय सहायक संजय अग्रवाल यांनी डाॅ. भाेसले यांचा बचाव केला. त्यानंतरही दुसऱ्या इमारतीच्या जिन्यावर बैसाणे तळ देऊन हाेते. काेणाला अात साेडायचे याचा निर्णय ते घेत हाेते. पोलिसही या वेळी आयुक्तांच्या दिमतीला होते.

हमरीतुमरीने वाढला तणाव
स्थायी सभापती साेनल शिंदे अायुक्त डाॅ. नामदेव भाेसले यांच्यात खडाजंगी हाेत असताना दाेघे चक्क हमरीतुमरीवर अाले. अाता हाणामारी हाेईल, अशी स्थिती या वेळी तयार झाली. मात्र, डीवायएसपी हिंमत जाधव तसेच शिवसेनेचे गटनेते संजय गुजराथी यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला.

नगरसेविकेचे महापौरांवर ताशेरे
माेर्चाघेऊन अालेल्या नगरसेविका मायादेवी परदेशी अायुक्तांना भेटायला गेल्या त्या वेळी वाद वाढत हाेता म्हणून महापाैर जयश्री अहिरराव यांनी माया परदेशी यांना बाहेर जाण्यास सांगितले असता, त्या भडकल्या. अत्यंत संतापात त्यांनी महापाैरांवरही ताशेरे अाेढले. अडीच वर्षांमध्ये महापाैरांनी काहीच केले नाही, असा अाराेप करीत त्या पुन्हा अावारात अाल्या. आवारातही त्यांनी आरोप सुरूच ठेवले होते.

कर्मचाऱ्यांच्या काळ्या फिती
आयुक्तडॉ. नामदेव भोसले सभागृहातून बाहेर पडल्यानंतर तत्काळ सभागृहातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सभागृहातून बाहेर पडून आयुक्तांच्या दालनात जमा झाले. त्याचवेळी घडल्या प्रकाराचा िनषेध म्हणून सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे.

पाइपलाइनचे काम झाले सुरू
पाचव्यागल्लीतीलपाइपलाइनचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून येथे रस्ता खोदून पाइपलाइन टाकण्यात येत आहे. त्या ठिकाणीही वाद असताना प्रशासनाने हा प्रश्न हाताळून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. दोन दिवसांत त्यातून पाणीपुरवठा सुरू होणार अाहे. मग मोर्चा कशासाठी? -डाॅ.नामदेव भोसले, आयुक्त,मनपा

दालनातही उडाली खडाजंगी
आयुक्तडॉ. नामदेव भोसले दालनात अाल्यावर प्रभाग क्रमांक २१ मधील महिला नगरसेवकही दाखल झाले. यात स्थायी समिती सभापती सोनल शिंदे, नगरसेवक मनोज मोरे, अमाेल मासुळे, महादेव परदेशी यांनी आयुक्त नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. िपण्याचे पाणी गेल्या काही महिन्यांपासून दूषित येत असतानाही पाइपलाइन दुरुस्ती केली जात नाही. या वेळी खराब पाण्याची बाटली दाखवली. आयुक्तांनी जनतेची छळवणूक थांबवावी िवकास कामे करावी, असे सांगितले. तर हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितल्यावर आयुक्तांनी बाटलीतल्या पाण्याचा घोट घेतला. तेव्हा सगळयांना अाश्चर्य वाटले. याच पाण्यावरून वाद सुरू होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेचे फोटो.. आयुक्तांना प्यावेलागले गढूळ पाणी....
बातम्या आणखी आहेत...