आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे जप्तीसाठी माेहीम; पालिका लागली कामाला, १२८ काेटींची वसुली करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गेली काही वर्षे राजकीय हस्तक्षेप अाणि शासनाचे अादेश यामुळे रखडलेल्या गाळे प्रकरणाला अाता गती येणार अाहे. महापालिका अायुक्तांनी मुदत संपलेल्या व्यापारी संकुलांच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्याचे अादेश दिले अाहेत. त्यामुळे प्रशासन साेमवारपासून कामाला लागणार अाहे.

कलम ८१(क) प्रमाणे मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे सन २०१२पासून थकित भाड्याची पाचपट दंडासह १२८ काेटी रुपयांची रक्कमही वसूल करण्यात येणार अाहे. या वेळी गाळे जप्तीचीही प्रक्रिया पूर्ण केली जाणार अाहे. याविषयी अायुक्तांनी लेखी अादेश काढले अाहेत.

महापालिकेच्या मालकीच्या २९ व्यापारी संकुलांपैकी १८ व्यापारी संकुलांतील २१७५ गाळ्यांची मुदत मार्च २०१२मध्ये संपली अाहे. या गाळ्यांसंदर्भात पालिकेने गेल्या चार वर्षांत अनेक ठराव केले त्यानुसार कारवाई करण्याचीही तयारी दाखवली. मात्र, गाळेधारकांनी वारंवार ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे धाव घेतली. पालिकेतील सत्ताधारी राज्यातील सत्ताधीश, असा संघर्ष असलेल्या जळगाव शहरात गाळेधारकांना राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून पुरेसे बळ मिळाल्याने चार वर्षांत व्यापारी संकुलांसंदर्भात एकही निर्णय हाेऊ शकलेला नाही. वास्तविक महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्त्राेत असलेल्या गाळ्यांच्या माध्यमातून मिळणारे काेट्यवधी रुपयांचे भाडेही थकले अाहे. त्याचा परिणाम थेट शहरातील विकास कामांवर झाला अाहे. त्यामुळे अायुक्त संजय कापडणीस यांनी मुदत संपलेल्या गाळ्यांसंदर्भात पुन्हा प्रक्रिया सुरू केल्याने महापालिका प्रशासन साेमवारपासून कामाला लागणार अाहे.

अायुक्तांच्यामुंबई दाैऱ्यानंतर अादेश
हाॅकर्सनेठराव विखंडणासाठी केलेल्या अर्जावर सुनावणीसाठी अायुक्त कापडणीस हे दाेन दिवस मुंबईत हाेते. या वेळी राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनीही हाॅकर्सना रस्त्यावर बसण्यासनकारदिला अाहे. अायुक्त हे मुंबईहून जळगावात परतल्यानंतर लागलीच त्यांनी मुदत संपलेल्या गाळ्यांसंदर्भात अादेश दिले अाहेत. त्यामुळे आगामी काळात नक्कीच माेठ्या घडामोडींची शक्यता वर्तवली जात अाहे.

अायुक्तांना मिळेल श्रेय :
गेल्याकाही वर्षांत जळगाव शहर विकासापासून वंचित अाहे. किरकोळ कामेही लाेकसहभागातून करावी लागत अाहेत. पालिकेचे उत्पन्न वाढीचे अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. स्वच्छतेची बाेंबाबांब अाहेच. पटकन लक्षात येईल, असे विशेष काम हाेऊ शकलेले नाही. त्यात हुडकाेच्या कर्जफेडीसाठी सकारात्मक प्रयत्न सुरू अाहेत, यासाठी प्रशासन पदाधिकारी प्रयत्न करीत अाहेत. अशा परिस्थितीत जर गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागल्यास त्यातून पालिकेत माेठ्याप्रमाणावर पैसा उभा राहिल्यास शहरात कामे हाेऊ शकतील. बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अायुक्तांच्या हातून गाळ्यांचा मार्ग मोकळा झाल्यास त्याचे श्रेय नक्कीच अायुक्तांना मिळेल, असा सूर व्यक्त हाेत अाहे.

नेमके काय अाहेत महापालिका अायुक्तांनी दिलेले अादेश?
अायुक्तकापडणीस यांनी मुदत संपलेल्या सर्वच गाळ्यांसदर्भात अादेश दिले अाहेत. शासनाच्या मार्गदर्शनाच्या अधीन राहून प्रक्रिया पूर्ण करून ठेवण्याचे निर्देश दिले अाहेत. यात मुदत संपलेल्या ज्या गाळ्यांची कलम ८१(ब) नुसार सुनावणी अादेश दिले अाहेत ते जप्तीसंदर्भात पुढील प्रक्रिया करण्यात येणार अाहे. तसेच कलम ८१(ब)नुसार ज्या गाळ्यांची सुनावणी पूर्ण झाली. मात्र, अादेश दिले गेलेले नाहीत. अशा गाळ्यांसंदर्भात नव्याने सुनावणी घेण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. त्यामुळे अाता पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवली जाईल. तसेच कलम ८१(क) प्रमाणे मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे २०१२पासून थकित भाड्याची पाचपट दंडासह थकित असलेली १२८ काेटी रुपयांची रक्कमही वसूल करण्यात येणार अाहे.

...अशी अाहे मार्केट गाळ्यांची संख्या
महात्माफुले मार्केट (एकूण गाळे २५९), सेंट्रल फुले मार्केट (६५१), रामलाल चाैबे (४०), भाेईटे मार्केट (२४), जुने बी.जे.मार्केट (२७२), डाॅ. बाबासाहेब अांबेडकर मार्केट (६४), वालेचा मार्केट (१२), छत्रपती शाहू मार्केट (१७५), शास्त्री टाॅवरखालील दुकाने (४), शिवाजीनगर दवाखान्याजवळील दुकाने (२), महात्मा गांधी मार्केट (१३७), भास्कर मार्केट (२८१), रेल्वे स्टेशन चाैक (१८), कै.लाठी शाळा इमारत (एक हाॅल), नानीबाई अग्रवाल (३०), डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान मार्केट (७७), जुने शाहू मार्केट (११२), धर्मशाळा मार्केट (१६).
बातम्या आणखी आहेत...