आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेल्या माकडाचा पुन्हा तिघांना चावा, वन विभागाने बाेलावली टीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गायत्रीनगरासह परिसरात उच्छाद मांडणाऱ्या पिसाळलेल्या माकडाने मंगळवारी पुन्हा तीन जणांना चावा घेऊन जखमी केले. या माकडाला दुसऱ्या दिवशीही वन्यजीव संस्थेसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते हाती लागले नाही.

गायत्रीनगरात चार दिवसांपासून एका पिसाळलेल्या माकडाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मंगळवारी माकडाने ज्ञानदेव कुंभार (रामेश्वर कॉलनी), राम पाटील कुंदन भोजवानी (दोघे राहणार गायत्रीनगर) या ितघांना चावा घेऊन जखमी केले. यातील दाेघांना िसव्हिलमध्ये तर एकाला खासगी रुग्णालयात दाखल केले हाेते. मंगळवारी वन विभागाचे एस.टी.भिलावे, पी.एल.पाटील, वन्यजीव संस्थेचे वासुदेव वाढे, बाळकृष्ण देवरे, रवींद्र सोनवणे, हृषिकेश राजपूत, बापू शिंदे, सतीश जवळकर यांनी माकडास पकडण्यासाठी प्रयत्न केले.

प्रयत्न अयशस्वी
वन्यजीव संस्थेचे २० कार्यकर्ते वन विभागाच्या तीन ते चार कर्मचाऱ्यांनी गायत्रीनगर परिसरात माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही ठिकाणी जाळेही लावले हाेते. मात्र, हे माकड उंच इमारतीवरून मार्ग काढण्यात यशस्वी झाले. त्यामुळे वनविभागाने अाता माकडाला पकडण्यासाठी बाहेरगावाहून टीम बोलावली आहे. ते बुधवारी येणार अाहेत.
मेहरुण तलाव येथील शिवाजी उद्यानात पिसाळलेल्या माकडाला पकडण्यासाठी धावत जाताना नागरिक.