आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅगिंगला कंटाळून विद्यार्थी भुसावळहून जळगावात, प्रवाशांच्या सतर्कतेने पाेलिसांच्या स्वाधीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माेठ्या मुलांकडून सततची हाेणारी मारहाण रॅगिंगला कंटाळून भुसावळच्या बियाणी मिलिटरी स्कूलच्या वसतिगृहातील नववीच्या दाेन विद्यार्थ्यांनी वसतिगृहातून थेट पळ काढल्याची धक्कादायक घटना साेमवारी घडली. वसतिगृह साेडल्यानंतर ही दाेघी मुले भुसावळ-जळगाव एसटीत बसली. मुले गाडी रडत असल्याचे पाहून प्रवाशांनी त्यांना अजिंठा चाैफुलीवरील वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिले. वाहतूक पाेलिसांनी प्राथमिक चाैकशीकरून त्या दाेघांना एमअायडीसी पाेलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर एमअायडीसी पाेलिसांनी त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बाेलावून दाेघांना त्यांच्या ताब्यात दिले.

भुसावळ-जळगाव बसमध्ये साेमवारी सकाळी ११ वाजता एका अासनावर बनियन घातलेले दाेन शाळकरी मुले रडत बसलेले हाेते. एसटीमधील प्रवाशांनी त्यांची चाैकशी केली असता त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यामुळे प्रवाशांनी दाेघांना गाडी अजिंठा चाैफुलीवर थांबल्यानंतर तेथील वाहतूक पाेलिस कर्मचारी नितीन ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. त्यांनी त्या दाेघांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात सहायक पाेलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्याकडे अाणले. देशमुख यांनी दाेघांची विचारपूस केली. त्या वेळी त्यांनी अाम्ही भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलमधील नववीच्या वर्गात शिक्षण घेत असल्याचे सांगितले. त्यांना अशा स्थितीत एसटीमध्ये बसून येण्याचे कारण विचारले असता त्यांनी वसतिगृहातील माेठी मुले दरराेज अाम्हाला मारहाण करतात. शाळेच्या शिक्षकांकडे तक्रार केली तर अाणखीन मारहाण करण्याची धमकी देतात. भौगोलिक स्थितीनुसार अखंड खान्देश प्रदेश हा नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार हा असून, पूर्वी ‘नाशिक झोन’अंतर्गतच जळगाव, धुळे, नंदुरबार समाविष्ट होता.
भौगोलिक परिस्थितीचा विचार करता नाशिक भाग हा तीनही जिल्ह्यांपासून अलग करण्याचा घाट घालत असून, उत्तर महाराष्ट्राचे तुकडे करू पाहत आहे. महाकाय थकबाकी असलेल्या मराठवाड्याशी खान्देश जोडला जाणार आहे. याचा विपरीत परिणाम जळगावच्या विकासावर होणार असून, भविष्यात होणारे धोके वाढणार अाहेत. यात जळगाव झोन हा तुलनात्मकदृष्ट्या मराठवाड्यापेक्षा वीज क्षेत्रात विकास कामात सरस असून, तांत्रिक हानी कमी थकबाकी वसुली जास्त आहे. मात्र, विभाग करताना जळगाव हे मराठवाड्याशी जोडले गेले, तर एकत्रितरीत्या तांत्रिक हानी जास्त थकबाकी अतिशय वाढलेली दिसेल. त्यामुळे भविष्यात तीनही जिल्ह्यांना वीजदरवाढीला सामोरे जावे लागेल, अशी भीतीही अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

रॅगिंग कायद्यांंतर्गत कारवाई
महाविद्यालय, वसतिगृहांमध्ये हाेणाऱ्या रॅगिंगच्या विराेधात १९९९मध्ये अॅण्टी रॅगिंग कायदा करण्यात अाला. त्यात वेळाेवेळी सुधारणा करण्यात अाल्या. राष्ट्रीय रॅगिंग विराेधी समितीने २००९ मध्ये helpline@antiragging.in ही हेल्पलाइन सुरू केली अाहे. रॅगिंगविराेधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई हाेऊ शकते.

मुख्याध्यापकांना कारवाईचे अधिकार
-काेणत्याहीशाळेतएखाद्या विद्यार्थ्यावर रॅगिंग हाेत असेल. त्याने या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केल्यास. ते रॅगिंगविराेधी कायद्यानुसार संबंधित त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांवर चाैकशी केल्यानंतर कारवाई करू शकतात. अॅड.केतन ढाके, जिल्हा सरकारी वकील
पालकांनीचमुलांना शाळेत सोडले

-रॅगिंग वैगरे होण्याचा विषय नाही. कदाचित घराची आठवण, ओढीमुळे हा प्रकार झाला असावा. मात्र, विद्यार्थी सुखरूप आहेत. चुकीचा काहीही प्रकार घडलेला नाही, उलट पालकांनीच मुलांना शाळेत सोडले. डी.एम.पाटील,प्राचार्य, बियाणी मिलिटरी स्कूल
बातम्या आणखी आहेत...