आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहेरगावच्या वाहनांची झाडाझडती; शहरात ठिकठिकानी फौजफाटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- निवृत्तीनगरात पाच लाखांच्या घरफाेडीनंतर पाेलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. बुधवारी शहरात चाैकाचाैकांत पाेलिसाचा माेठा फौजफाटा रस्त्यावर उतरला हाेता. त्यांनी महामार्गावर बाहेरगावाहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तर शहरात विनाक्रमांकाच्या दुचाकींची कसून तपासणी केली; पण रात्री उशिरापर्यंत त्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान गेल्या महिन्यात शहरात २० ठिकाणी चाेऱ्या झाल्या. यात चाेरट्यांनी ९२ लाख हजारांचा एेवज लंपास केला अाहे. याप्रकरणी पाेलिस प्रशासनाने १५ संशयितांना पकडले अाहे. परंतु त्यांच्याकडून त्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे चाेऱ्या उघड करण्यास पाेलिस दल अपयशी ठरत अाहे.

शहरात महिनाभरापासून चाेरट्यांनी धुमाकूळ घातला अाहे. छेडछाड, चाेरी, घरफोडीच्या घटनांनी तर कहर केला अाहे. किरकाेळ वादामुळे केव्हा ही तणाव निर्माण हाेताे. या घटनांमुळे शहर असंवेदनशील हाेत अाहे. साेमवारी मध्यरात्री तर भरपावसात रेनकाेट घालून अालेल्या चार चाेरट्यांनी प्राध्यापकाच्या घरात उंबरठ्याची पूजा करून चाेरी केली. यात त्यांनी पाच लाखांचा एेवज लंपास केला. चाेरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या अाहेत. विशेष म्हणजे समाेर कॅमेरा दिसत असतानाही एका चाेराने बिनधास्तपणे सीसीटीव्हीकडे पाहून पाेझ दिली. यावरून चाेरट्यांची किती हिंमत वाढली अाहे हे दिसून येते. तर दुसरीकडे पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर पाेलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ‘जाेर’ बैठका घेऊन त्यांना फक्त ‘दम’ भरत अाहेत. या बैठकांनंतरही प्रत्यक्षात पाहिजे तसे यश येत नसल्याचे स्पष्ट दिसून येत अाहे. मंगळवारी डाॅ.सुपेकरांनी अधिकारी अाणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर बुधवारी कधी नव्हे तर पाेलिस यंत्रणा प्रत्येक चाैकाचाैकात रस्त्यावर उतरलेली दिसली. प्रत्येक पाेलिस ठाण्यात मंजूर संख्येपेक्षा कमी कर्मचारी असल्याची नेहमीच अाेरड हाेते. त्यामुळे पाेलिस अधीक्षकांनी सकाळीच प्रत्येक पाेलिस ठाण्याचे हजेरी मास्टर बाेलावून स्थिती जाणून घेतली. त्यानुसार त्यांनी बंदाेबस्ताचे नियाेजन केले अाहे.

पाेलिसांच्या रडारवर पारधी टाेळी
शहरात३० जुलै अाणि अाॅगस्टला झालेल्या घरफाेड्यांमध्ये पारधी टाेळ्यांचा हात असल्याचा संशय अाहे. साेमवारी रात्री निवृत्तीनगरात झालेल्या चाेरीच्या वेळी चाेरट्यांनी घराच्या उंबरठ्यावर ११ रुपये ठेऊन चाेरी केली हाेती. पारधी टाेळीचीही चाेरी करण्याची अशीच पद्धत अाहे. तीन वर्षांपूर्वी अादर्शनगरात दिलीप झांबड यांच्याकडे चाेरी केल्यानंतर चोरटे शाैच करून गेले हाेते. हा प्रकार पारधी टाेळी करीत असल्याने त्यांच्यावर संशय व्यक्त केला हाेेता. मात्र, हा चोरटा बीड येथील सिंकदर नावाचा सराईत घरफाेड्या निघाला हाेता. त्यामुळे पाेलिसांची दिशाभूल करण्यासाठी चाेरटे अशा वेगवेगळ्या युक्त्या लढवत अाहेत.

अाॅपरेशन अाॅल अाऊट
घरफाेड्यांच्यापार्श्वभूमीवर शहरातील सर्व पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत अाॅपरेशन अाॅल अाऊट राबवण्याचे अादेश डाॅ. सुपेकर यांनी दिले अाहेत. त्यामुळे बुधवारी रात्री सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचारी या माेहिमेत सहभागी हाेणार अाहेत. रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या संशयितांची तपासणी केली जाणार अाहे.

नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज
शहरातवाढलेल्या घरफाेड्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिकांच्या मदतीचीही तेवढीच गरज अाहे. नागरिकांनी थाेडी काळजी घेतली तर अनेक घरफाेड्या राेखल्या जाऊ शकतात. गावाला जाताना घरात राेख रक्कम किंवा दागिने ठेवू नयेत, अाजूबाजूच्यांना सांगून जावे, अशा छाेट्या-छाेट्या गाेष्टी जरी पाळल्या तरी घरफाेड्या राेखणे शक्य हाेईल, असे पाेलिस अधीक्षकांनी सांगितले.

चाैकाचाैकांत लावला बंदाेबस्त
घरफाेडीच्याघटनेनंतर बुधवारी अजिंठा, इच्छादेवी, अाकाशवाणी चाैफुली, शिव काॅलनी, बहिणाबाई उद्यान, स्वातंत्र्य चाैक, खाेटेनगर, नेरी नाका, पांडे डेअरी, चित्रा चाैक, शास्त्री टाॅवर चाैक, शिवाजीनगर परिसरात जागाेजागी पाेलिस रस्त्यावर तैनात हाेते. शहर वाहतूक पाेलिस विनाक्रमांकाच्या माेटारसायकल तर इतर पाेलिस कर्मचारी बाहेरील जिल्ह्यांच्या वाहनांची थांबवून चाैकशी करीत हाेते. दिवसभर ही माेहीम राबवल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पाेलिसांच्या हाती काहीच लागले नाही. बुधवारी पाेलिस जसे रस्त्यावर उतरले. तसे त्यांनी दरराेज काम केले तर शहरातील अनेक गुन्हे अापाेअाप कमी हाेतील, अशी नागरिकांमध्ये चर्चा हाेती.

महिन्याभरात २० चाेऱ्या
शहरात जुलै ते अाॅगस्टपर्यंत २० ठिकाणी चाेऱ्या झाल्या. त्यात चाेरट्यांनी ९२ लाख हजार रुपयांचा एेवज लंपास केला अाहे. मात्र, त्या प्रमाणात पाेलिसांना मिळालेले यश हे नगण्य अाहे. त्यांनी अातापर्यंत फक्त १५ संशयितांना अटक केली अाहे. त्यातील फक्त एक चाेरटा हा २६ जुलैला शाहू महाराज हाॅस्पिटलसमाेर पकडलेला संशयित अाहे. उर्वरित १४ चाेरटे जिल्ह्यातील जुन्या इतर गुन्ह्यांमधील संशयित अाहेत.
निवृत्तीनगरातील नागरिकांचे निवेदन
निवृत्तीनगरातीलसुरेश अत्तरदे यांच्या घरात साेमवारी रात्री घरफाेडी झाली. याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी बुधवारी जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांना निवेदन दिले. त्यात महामार्गालगत असलेल्या निवृत्तीनगरात गेल्या पाच वर्षांपासून चाेऱ्यांचे प्रमाण वाढले अाहे. त्यामुळे पाेलिसांची गस्त वाढवावी. चाेरट्यांना पकडून नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी केली अाहे. या वेळी माजी महापाैर विष्णू भंगाळे, सुरेश अत्तरदे, मंगलसिंग सोनवणे उपस्थित हाेते.

रेल्वे पाेलिसांना अधीक्षक भेटले
शहरात सध्या सुरू असलेल्या घरफाेड्यांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी रेल्वे पाेलिस दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी शहरात रेल्वेचे माेठे जंक्शन असल्याने रेल्वेच्या मार्गाने चाेरटे येण्याचे प्रमाण अधिक अाहे. त्यामुळे रेल्वे पाेलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्या समन्वयाने पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...