आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांची तपासणी पूर्ण करता वाहन निरीक्षक गायब,जामनेरात आरटीओंविरुद्ध संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर- जामनेर येथे बुधवारी कॅम्पमध्ये आलेल्या वाहनांची तपासणी अपूर्ण सोडून वाहन निरीक्षकांनी काढता पाय घेतला. पावत्या फाडून पैसे भरलेले असतानाही वाहनांची तपासणी झाल्याने संतप्त वाहनमालकांनी एजंटला घेराव घातला. मात्र वाहन निरीक्षक कुणालाही सांगता अचानक निघून गेल्याने एजंटही वाहनमालक, चालकांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही.

महिन्याच्या अखेरच्या बुधवारी जामनेर येथील विश्रामगृहात वाहन तपासणीसाठी वाहन निरीक्षक कॅम्प घेत असतात. ठरलेला वार असल्याने तालुकाभरातील वाहनमालक आपापली वाहने तपासणीसाठी जामनेरला आणलेली होती. सकाळी ११.३० वाजेदरम्यान तीन वाहन निरीक्षक आले. शोरूममधून विक्री झालेल्या डिलरकडील नवीन गाड्यांसह काही मोटारसायकलींची पासिंग करण्यात आली. दरम्यान, शंभरावर तीनचाकी, चारचाकी वाहनेही तपासणीसाठी आलेली होती. मात्र, वाहन निरीक्षकांनी दुपारी वाजेदरम्यान तपासणी थांबवून कुणालाही काही सांगता आपल्या वाहनात बसून जळगावकडे निघून गेले. जेवणासाठी गेले असतील, अशी शंका आल्याने वाहनचालक, मालक आपापली वाहने घेऊन थांबलेलेच होते.
तासाभराचा कालावधी उलटूनही निरीक्षक परत आले नसल्याने वाहनमालक, चालकांची कुरबूर सुरू झाली. याबाबत काहींनी एजंट्सना विचारणा केली. एजंट्सनी वाहन निरीक्षकांशी संपर्क साधला असता, न्यायालयीन कामकाज असल्याने आपण जळगावला निघून गेल्याची माहिती एजंट्सला दिली. एजंट्सनी ही माहिती देताच वाहनमालक, चालक चांगलेच संतापले. त्यांनी ‘पासिंग करायचे नव्हते तर पावत्या फाडून पैसे का घेतले’, एजंट्सला घेराव घालून जाब विचारला. मात्र, एजंटही याबाबत अनभिज्ञ हाेते. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे संपर्क करून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ‘वाहन निरीक्षकांचे मोबाइल नंबर आमचेकडे नाहीत. अद्याप ते कार्यालयात आलेले नाहीत. याबाबत उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देतो,’ असे कार्यालयीन अधीक्षक एस. ओ. पवार यांनी सांगितले.

दोन दिवसांपासून नुकसान
तपासणीकरताना वाहनात कुठलेही सामान भरलेले नसावे, असा नियम आहे. त्यामुळे माल ट्रान्सपोर्टसाठी भाडे आलेले असतानाही तपासणी करावयाची असल्याने दोन दिवसांपासून ट्रक उभा करून ठेवला. आज तपासणी होईल, अशी खात्री होती. चिरीमिरी मिळते म्हणून नवीन वाहनांची तपासणी करून काही सांगताच वाहन निरीक्षक निघून गेल्याने आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करावा लागला. खालीदजकी अब्दुल मुजफ्फर, ट्रकमालक, जामनेर
पैशांसाठी अडवणूक
शोरूममधूनविक्री झालेल्या गाड्यांच्या पासिंगसाठी डिलरकडून पैसे मिळतात. अन्य वाहनचालक ते देऊ शकत नाहीत. म्हणून केवळ नव्याने विक्री झालेल्या वाहनांसह अन्य वाहनांपैकी थोड्या वाहनांची तपासणी करून अधिकारी निघून गेले, असे आरोपही या वेळी संतप्त चालक, मालकांनी केले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, पावती...
बातम्या आणखी आहेत...