आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णाच्या नातेवाइकांवर दंगलीचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रुग्णाला भेटू दिले नाही म्हणून नातेवाइकांनी सहयाेग क्रिटिकल केअर सेंटरमध्ये साेमवारी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग डाॅक्टरांच्या दालनाच्या काचा फाेडल्या हाेत्या. याप्रकरणी मंगळवारी रुग्णालयाच्या संचालकांनी तक्रार दिल्यानंतर शहर पाेलिस ठाण्यात रुग्णाच्या नातेवाइकांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला अाहे.

धानवड येथील शेतकरी शिवाजी भिका पाटील (वय ४०) यांना जूनला अस्वस्थ वाटू लागल्याने डाॅ. मनाेज पाटील यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले हाेते. जूनला पाटील यांना सहयाेग क्रिटिकल हाॅस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात अाले. त्यानंतर त्यांच्यावर दाेन दिवसांपासून त्याच ठिकाणी उपचार सुरू हाेते. साेमवारी सायंकाळी धानवड येथून पाटील यांचे नातेवाईक, मित्रमंडळी भेटण्यासाठी अाले हाेते. मात्र, त्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे पाटील यांचे नातेवाईक अाणि हाॅस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद हाेऊन बाचाबाची झाली.

संतापलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी अतिदक्षता विभागाच्या दरवाजाच्या काचा फाेडून डाॅक्टरांच्या दालनाची ताेडफाेड केली. तसेच डाॅ. अरुण पाटील, डाॅ. सुनील पाटील, कर्मचारी ज्ञानेश्वर उचाळे, अनिता शिरसाट, अलका काळे, राजेंद्र बऱ्हाटे यांना मारहाण केेली. तसेच डाॅ. सुनील पाटील यांचा माेबाइल हिसकावून फाेडला. याप्रकरणी रुग्णालयाचे संचालक डाॅ. अरुण पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर रुग्ण शिवाजी पाटील याचा भाऊ रवींद्र भिका पाटील याच्यासह १० ते १५ नातेवाइकांवर शहर पाेलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...