आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनसाखळी चाेरट्यांची अमळनेरला धूमस्टाइल,शिक्षिकेच्या गळ्यातील साेनसाखळी अाेढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- जळगावला साेनसाखळी चाेरट्यांनी अक्षरश: हैदाेस घातलेला अाहे. चाेपड्यातही दाेन दिवसांपूर्वी एका महिलेची भररस्त्यात साेनसाखळी अाेढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. त्यापाठाेपाठ अमळनेरला साेनसाखळी चाेरट्यांनी ताेच प्रकार सुरू केलेला अाहे. शहरात चाेरट्यांनी धुमाकूळ घातला अाहे.

शहरातील इंदिरा गांधी शाळेजवळील मंगलमूर्ती काॅलनीत माेटारसायकलवर अालेल्या दाेन चाेरट्यांनी शिक्षिकेच्या गळ्यातील साेनसाखळी हिसकावून पळ काढला. अशा वारंवार हाेणाऱ्या घटनांमुळे भीतीचे निर्माण झाली.

इंदिरा गांधी शाळेतील शिक्षिका वंदना बाळकृष्ण पाटील या मधल्या सुटीत मुलाला औषध देण्यासाठी घरी जात होत्या. बुधवारी सकाळी ९.४५ वाजता देशमुख बंगल्याकडून दोन अज्ञात मोटारसायकलस्वार आले. त्यांनी पाटील यांच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून स्वामी समर्थ मंदिराच्या दिशेने पळ काढला. शिक्षिकेने आरडाओरड करताच तरुणांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे पसार झाले होते.

डीबी यंत्रणा अकार्यक्षम
पोलिस यंत्रणा अगदी सुस्तावलेली आहे. कोणत्याही प्रकारची तपासणी अथवा कारवाई केल्याचे चित्र नाही. सरावलेले चोरटे अमळनेर शहरात दिवसाढवळ्या बळजबरीने वस्तू, पैसे हिसकावून पळून जात आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबतीत पोलिसांनी काहीही पाऊल उचलले नाही. त्यामुळे शहरात पोलिस यंत्रणा आहे किवा नाही? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

दाेन महिन्यांत चार घटना घडल्या
गेल्यादाेन महिन्यांत चार घटना घडल्या अाहेत. पटवारी काॅलनीजवळ महिलेची साेनसाखळी लंपास, पाेस्ट अाॅफिसजवळ शिक्षिकेची पर्स लांबवली हाेती. न्यू प्लाॅटमधील नांदेडकर हाॅलजवळून एक लाख रूपयांची बॅग हातातून हिसकावली हाेती. तसेच पाेस्ट अाॅफिसजवळ एकाची बॅग चाेरी हाेण्यापासून वाचली. या घटनांकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत अाहे. कारवाई हाेत नसल्याने चाेरट्यांची मुजाेरी दिवसेंदिवस वाढत अाहे.

उद्यापासून गस्त वाढवणार
उद्यापासून शहरात गस्त वाढवण्याबाबत सूचना पोलिस निरीक्षकांना करण्यात येतील. वाढत्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात कडक पाऊल उचलले जाईल. दिवसा लुटीचे प्रकार वाढत असल्याने त्यावर वचक बसवण्याचा प्रयत्न केला जाईल. रमेशपवार, उपविभागीय पाेलिस अधिकारी
बातम्या आणखी आहेत...