आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल दंगलप्रकरणी १३ संशयितांना मिळाली कोठडी, यंत्रणा अलर्ट, सीसीटीव्ही द्वारे शोधमोहीम सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- शहरातरविवारी रात्री गोमास वाहतुकीच्या संशयांवरून दगडफेकीसह पोलिस ठाण्यातील साहित्याची तोडफोड झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत १३ जणांना ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिस ठाण्याच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची सोमवारी अपर पोलिस अधीक्षक, डीवायएसपींनी पाहणी केली.

रविवारी रात्री वाजेच्या सुमारास भुसावळ रस्त्यावर दूरसंचार विभागाच्या कार्यालयाजवळ गोमांस वाहतुकीच्या संशयावरून काही तरुणांनी टाटा मॅजिक वाहन रोखून पोलिसांना कळवले. पोलिस तपासणी करेपर्यंत संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. तसेच कायदेशीर कारवाईचे आश्वासन देत जमावाला शांततेचे आवाहन केले. मात्र, ऐकण्याच्या स्थितीत नसलेल्या जमावाने पोलिस स्थानकात दगडफेक केली. यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे डीवायएसपी योगेश चव्हाण, अपर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सर्च मोहीम राबवून १३ जणांना ताब्यात घेतले.

Ãघटनास्थळी आलेल्या जमावाव्यतिरिक्त इतर सर्व समाजबांधवांनी ठेवलेला संयम येथील एकतेची ग्वाही देतो. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिस प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. नंदकुमारठाकूर, अपर पाेलिस अधीक्षक, जळगाव
वाहनांच्या काचा फोडल्या : याघटनेत पोलिस ठाण्यातून पळत बाहेर आलेल्या जमावातील काही समाजकंटकांनी भुसवाळ टी-पॉइंटजवळ लावलेल्या अॅपेरिक्षा, मिनीडोअरच्या काचादेखील फोडल्या. किरकोळ दगडफेकही केली. याप्रकरणी हवालदार कैलास इंगळे यांच्या फिर्यादीवरून १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी चव्हाण, सहायक निरीक्षक जगदीश परदेशी तपास करीत आहेत.

अफवांचे पीक जोरात : पोलिसठाण्यात जमावावर नियंत्रणासाठी झालेला लाठी चार्ज, तसेच जमावाकडून झालेल्या दगडफेकीमुळे शहरासह तालुक्यात दंगलीची अफवा पसरली. बाजारपेठेतील दुकाने तत्काळ बंद करून व्यावसायिक, नागरिक सैरावैरा पळत सुटले. या पार्श्वभूमीवर सोमवारीदेखील शहरात फैजपूर, निंभोरा, राज्य राखीव दलासह अतिरिक्त बंदोबस्त तैनात होता.

संशयितांना कोठडी : नितीनबारी, मोहन शिंदे, कुंदन बारी, भरत धनगर, तेजस महाजन, मुकेश कोळी, दत्तात्रय नन्नवरे, शेखर नन्नवरे, ज्ञानेश्वर नन्नवरे, गणेश नन्नवरे, राहुल चौधरी, योगेश चौधरी, धीरज बडगुजर यांना ऑगस्टपर्यंत न्यायालयीन काठडी मिळाली.
सोमवारी झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांनी ठिकठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त लावला आहे.