आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Issue Of Gran And Non Granteble Admission In M J College

अनुदानित जागा रिक्त तर विनाअनुदानित फुल्ल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मू.जे. महाविद्यालयात सन 2013-14 साठी इयत्ता अकरावीत प्रवेश देताना वाणिज्य आणि विज्ञान शाखेत मिळून 100 अनुदानित जागा रिक्त ठेवून विनाअनुदानित जागा भरल्याची तक्रार शैलेश कुळकर्णी यांनी माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे.

कुळकर्णी यांनी मू.जे. महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात माहितीच्या अधिकाराने माहिती मागवली आहे. त्यानुसार महाविद्यालयाने ऑगस्टमध्ये काही अनुदानित जागा भरल्या होत्या. मात्र त्यानंतरही विज्ञान शाखेत 60 आणि वाणिज्य शाखेत 40 अनुदानित जागा रिक्त असल्याचा दावा कुळकर्णी यांनी केला आहे.

मात्र, अनुदानित सर्व जागा भरल्या असल्याचे महाविद्यालयाचे म्हणणे आहे. तशी माहिती महाविद्यालयाने शिक्षणाधिकारी यांच्याकडेही पाठविली आहे.

जागा पूर्ण भरल्या
महाविद्यालयाच्या अनुदानित जागा पूर्णपणे भरल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार झाली आहे. सुरुवातीला विनाअनुदानित जागांवर प्रवेश दिले होते. नंतर अनुदानित तुकडीत जागा रिक्त झाल्यावर त्यांना फीचे पैसे परत करून अनुदानित तुकडीत प्रवेश दिले आहेत. कुळकर्णी यांच्यावर संस्थेने कारवाई केलेली असल्यामुळे ते अशी माहिती पसरवित आहेत. अनिल राव, प्राचार्य, मूजे महाविद्यालय

चौकशी करणार
मू.जे.त अकरावी प्रवेशात घोळ असल्याची तक्रार आली आहे. तक्रारकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी केली जाणार आहे. शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक