आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळ्यांचे सील काढल्याप्रकरणी आज खंडपीठात सुनावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नऊगाळ्यांचे सील उघडल्याप्रकरणी दाखल याचिकेत मंगळवारी अाैरंगाबाद खंडपीठात कामकाज हाेणार अाहे. तर व्यापाऱ्यांनीच दाखल केलेल्या कलम ४५० ‘अ’ च्या मुद्द्यावर मंत्रालयात राज्यमंत्र्यांकडे मंगळवारी बैठकीचे अायाेजन केले अाहे. दाेन्ही ठिकाणच्या चर्चा निर्णयावर पालिका पाच लाख जनतेचे भवितव्य अवलंबून राहील.

ठराव क्र. १३५ ला स्थगिती िमळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी कलम ४५० ‘अ’ प्रमाणे कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली अाहे. यासंदर्भात नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत अायुक्त गाळेधारकांची बैठक २८ राेजी सकाळी ११ वाजता हाेणार अाहे. तर कलम ८१ ‘ब’ अन्वये मुदत संपलेल्या गाळ्यांना सील करून ताबा घेण्याची कारवाई पालिकेने केली हाेती. ही कारवाईच राज्य शासनाने रद्द ठरवत सील उघडण्याचे अादेश दिले हाेते. यासंदर्भात महापाैर राखी साेनवणे उपमहापाैर सुनील महाजन यांनी अाैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली अाहे. यात शासन गाळेधारकांना नाेटीस काढून म्हणणे मांडण्याचे अादेश दिले अाहेत.

गाळेधारकांचा कल कायदेशीर मार्गदर्शनाकडे
खंडपीठाने गाळेधारक, राज्यमंत्री, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव, मनपा अायुक्तांसह १२ जणांना नाेटीस बजावली अाहे. यात गाळेधारकांकडून साेमवारी कायदेशीर मार्गदर्शन घेण्याचे काम सुरू हाेते. महापाैर उपमहापाैरांनी अायुक्तांकडून करण्यात अालेली कारवाई याेग्य ठरवल्याने गाळेधारक काय बाजू मांडतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार अाहे.
...तर लिलावासाठी महासभा
मंगळवारच्याबैठकीनंतर महासभा अायाेजित करण्याचा प्रयत्न राहणार अाहे. मनपाच्या हितासाठी गाळ्यांचा लिलाव करण्यात यावा, असा सूर नगरसेवकांमध्ये अाहे. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीनंतर राेजी लिलावाचा ठराव करण्यासाठी महासभा घेतली जाण्याची शक्यता अाहे.

मनपा अापल्या भूिमकेवर ठाम
महात्माफुले व्यापारी असाेसिएशन सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी २९ जून राेजी शासनाकडे अर्ज केला अाहे. त्यात सुमारे २२ मुद्दे मांडले अाहेत. त्याला मनपा राज्यमंत्र्यांकडे अहवालाद्वारे उत्तर देणार अाहे. पालिकेच्या मते ४५० ‘अ’ संदर्भातील अर्जातील मुद्दे निराधार कायद्याला धरून नाहीत. कलम ७९ नुसार करार मुदत संपलेल्या गाळ्यांचा विनियाेग नियमानुसार लिलाव पद्धतीने करणे अपेक्षित अाहे, असे स्पष्ट मत अाहे. त्यामुळे अायुक्तांकडून हाच मुद्दा लावून धरण्याची शक्यता अाहे.

उपसचिवांनी मागवली माहिती
महापािलकेचीअार्थिक स्थिती सुधारण्यासाठी किंवा उत्पन्नवाढीसाठी काय प्रयत्न केले यासह त्याच्या फलश्रुतीची वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्याचे पत्र उपसचिवांनी महापािलका प्रशानाला दिले अाहे. मंगळवारच्या मंत्रालयातील बैठकीत ही माहिती सादर केली जाणार अाहे.