आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परप्रांतीयाला रेल्वेतून आेढून लुटले! मारहाण करून एक हजार रुपये लांबवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जखमी राजेश यादव
भुसावळ - शहरातील वेडीमाता मंदिर ते महात्मा फुलेनगरच्या रेल्वे आऊटवर पुष्पक एक्स्प्रेसने लखनऊ येथून मुंबईला जाणा-या प्रवाशाला रेल्वे गाडीतून ओढून चार जणांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या खिशातून हजार रुपये रोख, रेल्वे प्रवासाचे तिकीट काढून चौघांनी पळ काढला. ही घटना गुरुवारी दुपारी १.४५ वाजेदरम्यान घडली. जखमी प्रवाशावर पालिका रुग्णालयात उपचार करण्यात आले.

नाेकरीनिमित्ताने राजेश यादव (वय २५, रा. लखनऊ) हा युवक मुंबईला पुष्पक एक्स्प्रेसने जात होता. शयनयान डब्यातील पायरीवर बसून तो मोबाइलवर बोलत होता. दरम्यान, ही गाडी वेडीमाता मंदिर ते महात्मा फुलेनगरच्या आऊटवर असताना याच परिसरातील चार टवाळखोरांनी यादवचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान मोबाइल हातात आल्याने चोरट्यांनी प्रवासी यादव याचा हात ओढून त्यास कमी स्पिडने असलेल्या गाडीतून ओढले. यातील दोघांनी त्याच्या शर्ट आणि पॅन्टच्या िखशातील एक हजार रुपये लांबवले. तसेच मोबाइल चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादव याने आरडाओरड केल्याने काही प्रवाशांनी गाडीखाली उतरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरटे घाबरून पसार झाले. दरम्यान, या झटापटीत प्रवासी यादव याचा उजवा हात, डोके, डावा पाय, आणि हाताला गंभीर दुखापती झाल्या. परिसरातील नागरिकांनी त्याला तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलवून जखमी प्रवाशाला पालिका रुग्णालयात हलवले. उपचारानंतर पोलिसांत गुन्हा दखल करताच प्रवासी पुन्हा लखनऊकडे रवाना झाला. रुग्णालयात काही समाजिक कार्यकर्त्यांनी या प्रवाशाला ४०० रुपये वर्गणी जमा करून दिली.

भामट्यांच्या टाेळीवर राजकीय वरदहस्त
शहरातीलवेडीमाता मंदिर ते महात्मा फुलेनगरदरम्यानच्या आऊटवर प्रवाशांना लुटण्याचे प्रकार सातत्याने होतात. या टळाळखो-यांच्या टोळीला राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जाते. पाेलिसांकडूनही ठाेस कारवाई हाेत नसल्याने या टाेळक्याचे फावते. आठवडाभरात दाेन प्रवाशांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. भामट्यांची मजल आता धावत्या रेल्वेगाडीतून प्रवाशांना लुटण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असल्याचे िचत्र यानिमित्ताने समाेर आले आहे.