आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात बांधकाम व्यावसायिकांची आयकर तपासणी; खटोड, कोल्हे, झुनझुनवालांकडे झाली चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावातील बांधकाम व्यावसायिकांची आयकर विभागाच्या तीन पथकांनी सोमवारी तपासणी केली. रात्री उशिरापर्यंत तपासणीची कार्यवाही सुरू होती. पाच ते आठ अधिकार्‍यांच्या पथकाकडून ही तपासणी सुरू होती.
जळगावातील बांधकाम व्यावसायिक श्रीकांत खटोड, दिलीप कोल्हे आणि सपन झुनझुनवाला यांच्याकडे सकाळपासून तपासणी सुरू केली. आयकर विभागाच्या पथकाने दिवसभर कागदपत्रे गोळा केल्यानंतर सायंकाळी सहानंतर तपासणीला प्रारंभ केला.
श्रीकांत खटोड यांचे काव्यर}ावली चौकातील श्रीश्री इन्फ्रास्ट्रर येथे आयकरचे पथक दिवसभर ठाण मांडून होते. खटोड यांच्या सुभाष चौक आणि नवीपेठेतील कार्यालयांची तपासणी सुरू होती. दिलीप कोल्हे यांच्या नूतन मराठा कॉलेजजवळील कार्यालयात दुसर्‍या पथकाने तपासणी केली. तिसरे पथक सपन झुनझुनवाला यांच्या नटवर टॉकीज परिसरातील कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करीत होते. तपासणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. प्रत्येक ठिकाणी पाच ते आठ अधिकार्‍यांचे पथक वेगवेगळय़ा माध्यमातून कागदपत्रांची तपासणी करीत होते. दरम्यान, या कारवाईबाबत माहिती देण्यास आयकरच्या अधिकार्‍यांनी नकार दिला.