आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी कलावंत होण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे, समारोप कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोटरी भवनात झालेल्या राष्ट्रीय कम्प्लिट थिएटर वर्कशॉपमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी उपस्थित योगेश भोळे, गनी मेमन, संजय काबरा, सूरज चौधरी, अनिल जोशी आदी. - Divya Marathi
रोटरी भवनात झालेल्या राष्ट्रीय कम्प्लिट थिएटर वर्कशॉपमध्ये सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी उपस्थित योगेश भोळे, गनी मेमन, संजय काबरा, सूरज चौधरी, अनिल जोशी आदी.
जळगाव : जीवनात कला असणे आवश्यक असून, नाट्यकलाकार हा समाजाचे देणे लागतो. चांगला माणूसच यशस्वी कलावंत होतो. यासाठी सातत्याने प्रयत्नशील असायला हवे. जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठी स्वप्ने बघायला पाहिजेत; परंतु ती पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवत कष्ट करण्याची आवश्यकता आहे, असा सूर नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मान्यवरांमधून निघाला. 
 
जननायक थिएटर आणि रोटरी क्लब अाॅफ जळगाव वेस्ट तसेच भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनच्या सहकार्याने रोटरी भवनात जळगाव शहरातील पहिले राष्ट्रस्तरावरील दिवसीय निवासी कम्प्लिट थिएटर वर्कशॉप पार पडले. बुधवारी या कार्यशाळेचा समारोप झाला. या वेळी प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे आपला कलाविष्कार सादर केला. समारोपप्रसंगी मंचावर दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रतिभा शर्मा आणि मुख्य नाट्य प्रशिक्षक प्रवीणकुमार गुंजन, रोटरी क्लब अाॅफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे, सामाजिक कार्यकर्ते गनी मेमन, संजय काबरा, सूरज चौधरी, जैन उद्योगसमूहाचे व्यवस्थापक अनिल जोशी उपस्थित होते. नटराजपूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी प्रशिक्षण घेतलेल्या सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित केली.
 
रोटरी वेस्टचे सचिव संजय इंगळे, डॉ.राजेश पाटील, फिरोज पिंजारी, अॅड.रवी गुजराथी, अॅड.वासुदेव बुधुखले, फरीद खान, सुरेश चौधरी, नितीन भोसले, विजय शिंपी, योगेश हिवरकर, संतोष खोपडे, सोनल चौधरी तसेच आमदार सुरेश भोळे, नगरसेवक सुनील माळी, नरेंद्र चव्हाण, रवींद्र धर्माधिकारी, विजय जैन यांनी सहकार्य केले. स्वामी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जननायकचे प्रमुख होनाजी चव्हाण यांनी आभार मानले. 
 
अभिनय, लेखन, दिग्दर्शनाचे प्रशिक्षण 
मुख्यनाट्य प्रशिक्षक प्रवीणकुमार गुंजन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. यात थिएटर, योगा, एरोबिक्स, देहबोली, संवाद कौशल्य, लेखन, दिग्दर्शन, पात्ररचना, प्रसंग नाट्य, रंग-वेशभूषा, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, निर्मिती प्रक्रिया यासोबतच पद्मभूषण हबीब तन्वीर, रतन थय्याम, इब्राहिम अल्काजी या तीन मोठ्या नाटककारांच्या नाट्यशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अभिनयाच्या विविध पैलूंवर प्रात्यक्षिकांसह कौशल्य प्रशिक्षणही देण्यात आले. 
 
३० प्रशिक्षणार्थी सहभागी 
कार्यशाळेत जळगाव, नागपूर, अमरावती, मूर्तिजापूर, अकोला, मुंबई, पश्चिम बंगाल येथील निवडक ३० प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. त्यांना डॉ.अनिता पाटील, सुनीता देवरे, अनिल कोष्टी, रमेश भोळे, योगेश शुक्ल, किरण अडकमोल, वैभव मावळे, विनोद ढगे, अॅड.महेश भोकरीकर या ज्येष्ठ रंगकर्मी-प्रशिक्षकांनी विविध सत्रांत नाट्यकलेच्या विषयांवर मार्गदर्शन केले. 
बातम्या आणखी आहेत...