आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटालियन ज्वेलरीची नावीन्यपूर्ण आभूषणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- दसर्‍याच्या मुहूर्ताला सोने खरेदीसाठी सुवर्ण बाजारपेठ सज्ज झाली आहे. सोन्यातील लाइटवेट अशी इटालियन ज्वेलरीची बाजारात रेलचेल आहे. दसर्‍याचा मुहूर्त साधून अनेक जणांचा सोने खरेदीकडे ओढा असतो. त्यामुळे दसर्‍याला सोन्याच्या बाजारपेठेत तेजी असते. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावातील चढ-उताराने सोन्याचा बाजार थंडावला होता. आता पुन्हा सोन्याला झळाळी आली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण अशा डिझाइनचे आभूषणे पाहायला मिळत आहेत. साधारण तीन ग्रॅम सोन्यात फुलपाखरू आणि हार्ट शेपचे पेंडल सेट आहेत.

भरीव दागिन्यांची मोठी रेंज
महिलांचा सर्वात आवडता दागिना म्हणजे गळ्यातील हार. त्यात अनेक रेंज उपलब्ध आहेत. सोन्यात कुंदन, महाराजा सेट, अँटिक असा पारंपरिक हार, चंदन, जडाऊ हार आणि राजवाडी कंठासारखे भरीव दागिने आहेत. मोहन माळेत कुंदनचे पॅच लावून त्याचा राजवाडी कंठा तयार करण्यात आला आहे.

इटालियन ज्वेलरीची रंगत
स्टिफ चेन प्रकारात जीबी स्टोनने सजविलेले पेंडल आणि त्यावर केलेली रेडियम पॉलिशमध्ये इटालियन हार प्रकार आहे. इटालियन स्टाइलमध्ये थोडासा भारतीय टच लावण्यात आला आहे. साधारण 50 ते 70 गॅ्रमचे हे हार आहेत. यात अनेक रंगांचे स्टोन लावले आहेत. सध्या सर्वात जास्त क्रेझ या ज्वेलरीची आहे. तरुणींसाठी उपयोगी अशी ही लाइट वेट ज्वेलरी आहे. यात कडे, अंगठी, कानातले, यात उपलब्ध आहेत.