आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात आयटीआय कर्मचारी भरती रखडली; ऑनलाइन मागवले होते अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील विविध शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेतील वर्ग- संवर्गातील विविध विभागातील कर्मचारी रिक्त पदांसाठी सरळसेवा पदभरतीने ऑनलाइन अर्ज मागवले होते.
मात्र, तीन महिने उलटूनही परीक्षेविषयी कुठलीही तारीख जाहीर झालेली नाही. यामुळे राज्यातील ११३२ पदांसाठी राज्यभरातून ४६ हजार उमेदवारांना संभ्रम असून ते परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. गुरुवारी विभागाने परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे परीक्षेविषयीच्या सूचना उमेदवारांना एसएमएसद्वारे कळवल्या जाणार आहेत, असे राज्य व्यवसाय शिक्षण विभागाच्या सूत्रांनी कळवले आहे.

परीक्षा शुल्काचा रोखीने स्वीकार
व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण विभागातर्फे १३ सप्टेंबर रोजी नियमित वेतनश्रेणीच्या ७०२ पदांसह ४३० ठोक मासिक वेतनावरील गट- गट- मधील पदांसाठी जाहिरात काढली होती. यासाठी सप्टेंबरपासूनच ऑनलाइन अर्ज स्वीकारले होते.
३० सप्टेंबरपर्यंत हे अर्ज स्वीकारले गेले. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क २०० रुपये हे स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात रोखीने स्वीकारले गेले होते. पदांची संवर्गीय माहिती विभागनिहाय समांतर आरक्षण, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा पद्धती यासंबंधीची माहिती संचालनालयाच्या संकेतस्थळावर दिली.