आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआयची 24पासून प्रवेश प्रक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दहावीच्या निकालानंतर आयटीआयमध्ये प्रवेश अर्जासाठी होणारी गर्दी आता कमी झाली आहे. यंदापासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असल्याने आयटीआयमध्ये कमालीची शांतता आहे. सोमवारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

कोअर ब्रॅचेसला पसंती
अभियांत्रिकी शाखेत इलेक्ट्रॉनिक्स या पारंपरिक शाखेला विद्यार्थी पसंती देतात, त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतही डिझेल मेकॅनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल लागला. यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहेत. पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच विद्यार्थी अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला मोठय़ा संख्येने प्रवेश घेतात. तर 30 ते 35 टक्के विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये प्रवेश घेतात. अभियांत्रिकीमुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे. विदेशातील नामांकित मोटार कंपन्यांच्या शाखा आपल्या देशात आणि शहरातही सुरू होत आहेत. त्यामुळेच आयटीआयमध्ये असलेल्या मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांना विद्यार्थी पसंती देत असल्याचे उपप्राचार्य पी.ई.पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.

अशी आहे स्थती
आठवी पाससाठी चार ट्रेड : सुतारकाम (जागा 21), फॉड्रीमॅन (21), संधाता (62), यांत्रिकी कर्षित्र (21), तारतंत्री (16).
दहावी पाससाठी 16 ट्रेड : यांत्रिक डिझेल (21 जागा), कॉम्प्युटर ऑपरेटिंग कम प्रोग्रॅमिंग असिस्टंट (52), सेंटर ऑफ एक्सलन्स प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (96), मोटार मेकॅनिक (32), वीजतंत्री (84), यांत्रिकी आरेखक (21), जोडारी (84), टर्नर (62), मशिनिष्ट (94), यंत्रकारागीर घर्षक (62), यांत्रिक प्रशीतन वातानुकूलिकरण (21), तारतंत्री (21), रेडिओ अँण्ड टीव्ही (21), इलेक्ट्रॉनिक्स (42), यांत्रिकी उपकरण इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (21), मशीन टूल मेकॅनिक (21).

भरतीची प्रक्रिया पारदर्शी होणार
मोटार मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक आणि इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडसाठी शासकीय आणि निमशासकीय संस्थेत नोकरीच्या संधी असल्याने विद्यार्थी याला पसंती देतात. ऑनलाइन प्रक्रियेमुळे गर्दी, गोंधळ कमी झाला आहे. पारदर्शीपणे ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून नुकसान टाळावे. पी.ई.पाटील, उपप्राचार्य, शासकीय आयटीआय

यंदा सर्वच आयटीआय ऑनलाइन प्रवेश
यंदा राज्यात सर्वच आयटीआयमध्ये ऑनलाइन प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी www.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावेत. 24 जूनपासून ही प्रक्रिया सुरू होईल. 9ला गुणवत्ता यादी जाहीर होईल. 10 जुलैला हरकती मागवल्या जातील. 15 पर्यंत कागदपत्रे पडताळणी, दुसर्‍या फेरीसाठी 16 ला निवड यादी जाहीर होईल. तिसरी अंतिम यादी 22ला जाहीर होईल.