आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटीआय पेपरफूट : दोन पेपर रद्द करण्याचा डीजीईटीचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - डायरेक्टरजनरल एम्प्लॉयमेंट अॅण्ड ट्रेनिंग (डीजीईटी)ने आयटीआयाचे ३० ३१ जुलैला झालेले दाेन्ही पेपर रद्द केले अाहेत. इलेक्ट्रीशियन ट्रेडचा थेअरी इंजिनिअरिंग ड्राॅइंग हे दाेन पेपर फुटले होते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त दिले होते. आता ही परीक्षा २० सप्टेंबरनंतर घेण्यात येणार आहे. देशभरातील आयटीआयमधील इलेक्ट्रीशियन ट्रेडच्या ‘थेअरी’ची प्रश्नपत्रिका आदल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मिळाली होती. याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. तसेच दुसऱ्या दिवशीही ‘इंजिनिअरिंग ड्राॅइंग’चा पेपरही फुटला होता. याविषयीची माहितीही पेपर होण्याआधीच डीजीआयटीस फॅक्सद्वारे कळवण्यात आली होती. त्याची दखल घेत डीजीआयटीने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.