आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटीआयच्या शिक्षकाने केला तरुणीचा विनयभंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - शहरातील धुळे रोडवरील शासकीय आयटीआयच्या शिक्षकाने तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रार चाळीसगाव पोलिसांत दाखल झाली आहे. संबंधित तरुणीने ऑगस्ट २०१५ला अायटीआमध्ये प्रवेश घेतल्यापासून दि. जानेवारी २०१६ दरम्यान तेथील शिक्षक पी.एल.नितनवरे यांनी तरुणीशी कोणतेही कारण नसताना वेळोवेळी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणीने या गोष्टीस नकार दिल्यामुळे शिक्षक नितनवरे याने तरुणीला लज्जा निर्माण होईल. असे कृत्य केल्याने तरुणीच्या तक्रारीवरून शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.