आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आयटीआयची लेखी परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शासकीय आयटीआयच्या अभ्यासक्रमाचे लेखी पेपर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेण्याची सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या निर्णयानुसार संपूर्ण देशात हा बदल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात 10 मार्च रोजी झालेल्या परीक्षेपासून ऑब्जेक्टिव्ह पद्धत लागू झाली.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपेक्षा प्रॅक्टिकलवर जास्त भर द्यावा लागतो. प्रॅक्टिकलसाठी अधिक वेळ देण्यात यावा, त्यामुळे थेरॉटिकल पेपरमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाने गेल्या वर्षभरापासून हा निर्णय घेतला होता. प्रत्येक राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कुशल कामगार घडवण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम विचारात घेऊन, काही ठिकाणी अभ्यासक्रमात बदल करून सुरुवात केली आहे. नवीन बदलामुळे विद्यार्थ्यांना 100 गुणांचा लेखी पेपर सोडवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह प्रश्‍नपत्रिका देण्यात आली.
प्रत्येक प्रश्‍नाला चार पर्यायी उत्तरे दिली होती. ऑब्जेक्टिव्ह पेपर असला तरी अभ्यास करूनच त्याची उत्तरे देता येतील, अशीच प्रo्नपत्रिका तयार करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त जास्त लिहिण्याचा त्रास कमी झाला. अभ्यास मात्र जास्तच करावा लागला आहे. मंत्रालयाच्या या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलवर भर देण्यास अधिक वेळ मिळणार आहे.