आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जडगाव हे मराठवाड्यातील पहिले कॅशलेस गाव, आदर्श घ्यावा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - आैरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव हे मराठवाडा विभागातील पहिले कॅशलेस गाव म्हणून जाहीर झाले असून या गावाचा आदर्श इतर गावांनीसुद्धा घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी केले. जडगाव येथे मंगळवारी दि.१३ रोजी सायंकाळी एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे.

आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषद व महाराष्ट्र ग्रामीण बँक करमाड शाखेने जडगाव हे गाव कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामसेवक सिद्धार्थ शेळके, करमाडचे शाख व्यवस्थापक अशोक कुलकर्णी व गावातील सुशिक्षित तरुणांनी आठ दिवस विशेष परिश्रम घेऊन २१२० खातेदारांचे बँकेतील क्रमांकांशी आधार कार्ड लिंक केले. त्यानुसार आता सर्व गावकरी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी यात आधारकार्डद्वारे सर्व आर्थिक व्यवहार करण्यात येणार आहेत. हे गाव कॅशलेस म्हणून जाहीर करण्यात आर्दड म्हणाले की, तुम्ही आता सर्व जणांचे आधार कार्ड बँकेला जोडले गेलेले आहेत.
आता मागे सरकू नका तुमचे जडगाव हे गाव शहराच्या जवळ असून शेतीमध्ये अग्रेसर आहे. स्वयंप्रकाशित व्हा, यापुढे जिल्ह्यात प्रत्येक गावात १०० स्वयंसेवक तयार करून सर्व १३५२ गावे कॅशलेस करता येतील. कॅशलेस हा अचूक आणि सुरक्षित व्यवहार आहे, असे आर्दड यांनी सांगितले.याप्रसंगी ग्रामसेवक सिध्दार्थ शेळके यांनी गावकऱ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. तर जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके यांनी प्रस्ताविक केले. या वेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष आर व्ही. उन्नम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सरव्यवस्थापक जी.जी. वाकडे यांनी कॅशलेस व्यवहार करण्याची माहिती दिली. सरपंच गोदावरी बेलकर व गावकऱ्यांनी पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व हार देउन सत्कार केला. ग्रामीण बँक करमाड शाखेचे व्यवस्थापक अशोक कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. गट विकास अधिकारी विठ्ठल हरकळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...