आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेतनातून कापलेले १३ काेटी मनपाने भरलेच नाही, २२०० कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापली रक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला विम्याचा हप्ता, कर्जाचा हप्ता भविष्य निर्वाह निधी अादी विविध कारणांसाठी रक्कम कपात करण्यात अाली अाहे. परंतु, ही रक्कम संबंधित खात्यात जमा करण्यात अालेली नाही. हा अाकडा तब्बल १३ काेटी ४३ लाखांचा असून कर्मचाऱ्यांची अार्थिक काेंडी हाेऊ लागली अाहे. ही रक्कम तातडीने जमा केल्यास फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांतर्फे देण्यात अाला अाहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून विम्याचा हप्ता, कर्जाचा हप्ता तसेच भविष्य निर्वाह निधी या सारख्या योजनांसाठी कपात करण्यात येत असते. तसेच कपात केलेली रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या त्या-त्या खात्यात भरणादेखील करणे गरजेचे असते. परंतु, गेल्या वर्षभरापासून पालिकेच्या २२०० कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम महापालिकेने संबंधितांच्या खात्यात भरणा केली नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले अाहे. हा अाकडा अाता १३ काेटी ४३ लाख ७२ हजार रुपये झाला असून ही एक प्रकारे कर्मचाऱ्यांची फसवणूक असून लेखा विभागात माेठा अपहार झाल्याचा संशय शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेने व्यक्त केला अाहे.

१४ दिवसांनंतर गुन्हा
कर्मचारीसंघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर यांनी १३ काेटी ४३ लाखांची रक्कम संबंधितांच्या निर्धारित खात्यात जमा करून संघटनेला पुरावा द्यावा. अन्यथा १४ दिवसांनंतर महापालिकेच्या लेखाधिकाऱ्यांविरुद्ध अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला अाहे.

गत काळाततेव्हाच्या परिस्थितीनुसार कपाती करून पगार अदा करण्यात अाला असेल. पगारातून पैसे कापले परंतु भरले गेलेले नाहीत. हा काेणताही अपहार नाही.
- जीवन साेनवणे, अायुक्त
६९ लाख ६६ हजार : एलअायसी
काेटी ३९ लाख ७९ हजार : ग.स.साेसायटी
काेटी ३१ लाख १८ हजार : पीएफ
काेटी लाख ५३ हजार : वेतनातून कपात केलेली अंशदानाची रक्कम
लाख ३४ हजार : धुळे नंदुरबार सहकारी साेसायटी.
काेटी लाख ५३ हजार : मनपास जमा करावयाची,
लाख २८ हजार : सेंट्रल कझु. शाॅप
लाख ९४ हजार : मृत्यू निधी
बातम्या आणखी आहेत...