आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहात क्षमतेपेक्षा दीडपट कैदी; डॉ.बोरवणकर नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कारागृह महानिरीक्षक डॉ.मीरा बोरवणकर या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी मंगळवारी शहरात आल्या होत्या. त्यांनी दुपारी 3 ते 5 या वेळेत जिल्हा कारागृहाला भेट दिली. या वेळी कारागृहात क्षमतेपेक्षा दीडपट कैदी अधिक असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. याबाबत डॉ.बोरवणकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ खंत व्यक्त केली. कर्मचार्‍यांच्या निवासस्थान परिसरातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली.

कारागृहात दुपारी 3 वाजता प्रवेश केल्यानंतर सुमारे दोन तास डॉ.बोरवणकर यांनी प्रत्येक बराकीतील बंदिवानांची भेट घेतली. तसेच कारागृहातील जेवण व इतर व्यवस्थांबाबत माहिती घेतली. शेवटच्या अध्र्या तासात कारागृहाचे पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांचीही पाहणी केली.

कारागृहात दीडपट कैदी जास्त आणि कर्मचारी निवासस्थान परिसरात असलेल्या अस्वच्छतेबद्दल डॉ.बोरवणकर यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. दरम्यान, त्यावर उपाय म्हणून जळगाव कारागृहाला ‘वर्ग-1’चा दर्जा देऊन दुसर्‍या मजल्याच्या बांधकामासाठी प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव यांनी दिली. तसेच अधीक्षकांकडून पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार कारागृहाच्या विस्तारीकरणासाठी प्रय} करणार असल्याचे डॉ.बोरवणकर यांनी सांगितले.

200च्या क्षमतेत 500 कैदी
जळगावच्या कारागृहात 200 कैदी सामावून घेण्याची क्षमता आहे; मात्र मंगळवारी कारागृहात 502 कैदी असल्याची नोंद होती. तसेच केवळ 12 बराकीत सर्व कैद्यांना ठेवावे लागत आहे. त्यामुळे अधीक्षकांनी कारागृहाला ‘वर्ग-2’ऐवजी ‘वर्ग-1’चा दर्जा मिळवण्याचा प्रस्ताव महिनाभरापूर्वी पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सध्याच्या 12 बराकींच्या वर पुन्हा नवीन 12 बराकींचे बांधकाम करता येणार आहे. शासनाने बांधकाम करणे शक्य आहे किंवा नाही, याबाबतची माहिती मागवली आहे. तसेच कारागृहात कर्मचारीही कमी आहेत. त्यामुळे सध्याच्या स्टाफवर अतिरिक्त ताण पडत असल्याचेही डॉ.बोरवणकर यांनी नमूद केले