आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन यांच्या कमबॅकने राजकीय वर्तुळात बदलाचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माजी अामदार सुरेश जैन यांना जामीन मिळाल्यानंतर ते शनिवारी शहरात येणार अाहेत. त्यामुळे तब्बल साडेचार वर्षांच्या राजकीय अज्ञातवासामुळे जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांसाठी निर्माण झालेली पाेकळी पुन्हा भरून निघणार अाहे. जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती अाणि अागामी निवडणुकांच्या ताेंडावर सुरेश जैन यांची एंट्री राजकारणाला अाणखी एक कलाटणी देणारी ठरेल, असे राजकीय जाणकारांचे मत अाहे.
जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांत अनेक नाट्यमय घडामाेडी घडल्या. जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचे खाेलवर परिणाम दिसून अाले. गेल्या तीन महिन्यांत माजी मंत्री एकनाथ खडसेंचा राजीनामा, शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांची राज्यमंत्रिपदी वर्णी अाणि अाता माजी अामदार सुरेश जैन यांचा बिनशर्त जामीन मंजूर हाेणे या बाबी जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या अाहेत. भाजप अाणि माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या दृष्टीने जैन यांना जामीन मंजूर हाेणे राजकीयदृष्ट्या नुकसानकारक अाहे, तर शिवसेनेसाठी जैन यांची जिल्ह्यातील एंट्री पक्षाची ताकद वाढविणारी ठरणार अाहे. अागामी काळात विधान परिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्हा पुन्हा एकदा निवडणुकांच्या रंगात ढवळून निघणार अाहे. या निवडणुकांत एकनाथ खडसे, सुरेश जैन या दाेन्ही नेत्यांच्या वर्चस्वाची अाणि प्रतिष्ठेची लढाई बघायला मिळणार अाहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे भाजपचे असले तरी, भाजपमधील अंतर्गत खडसे विराेधक अाणि सुरेश जैन यांचे खुले समर्थक ही दाेन्ही रूपे जिल्ह्याच्या राजकारणात लपून राहिलेली नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकांत त्यांची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागून अाहे.

परिणाम राजकीय
एकनाथ खडसे यांचे मंत्रिपद गेल्याने खडसे यांचे समर्थक पक्षावर नाराज अाहेत. पक्षाकडे नाराजी व्यक्त करत त्यांच्या समर्थकांनी येत्या निवडणुकांत पक्षाचे काम करण्याचा मनाेदय बाेलून दाखविला अाहे. खडसे यांच्या समर्थकांच्या असहकार अांदाेलनात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करून दाखवावे. त्यांची जिल्ह्यातील ताकद येत्या निवडणुकांत दाखवून द्यावी, असे अप्रत्यक्ष अाव्हानच खडसेंच्या समर्थकांनी दिले अाहे. असे झाल्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची राजकीय काेंडी हाेऊ शकते. त्यात खडसेंच्या समर्थकांची राजकीय भूमिका महत्त्वाची मानली जात अाहे, तर दुसरीकडे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जाेडीला सुरेश जैनदेखील असल्याने शिवसेनेची बाजू अाज तरी भक्कम असल्याचे चित्र अाहे. या राजकीय पार्श्वभूमीवर जैन यांची जळगाव शहरातील एंट्री राजकीय उलथापालथीचे कारण बनू शकते, असे मत जाणकारांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...