आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जैन’ला 9 हजार कृषिपंपांची ऑर्डर, महाराष्ट्र शासनाने दिले ४७३ कोटी रुपयांचे सर्वात मोठे काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्यसरकारने जैन इरिगेशनला जगातील सर्वात मोठी ४७३ कोटी रुपयांची सोलर कृषिपंपांची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे राज्यात 8 हजार ९५९ कृषिपंपांचा पुरवठा जैन इरिगेशन करणार आहे महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात २० जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यात बुलडाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील विविध भाग असतील. या योजनेत ३, आणि ७.५ एच.पी. क्षमतेचे पंपसेट बसवण्यात येणार असून, ४,५५९ एसी पंप्स ४,४०० डीसी पंप्स लावण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीने महाराष्ट्रात पाच लाख सोलर कृषिपंप बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात हजार ९५९ कृषिपंप बनवण्याची ऑर्डर जैन इरिगेशनला मिळाली आहे. या प्रकल्पासाठी एकूण १४ टेंडर आले होते. त्यातून जैन इरिगेशनला कामाची गुणवत्ता,अनुभव अटी-शर्तींच्यापूर्तीनुसार ऑर्डर दिली आहे. जैन इरिगेशनने सोलर कृषिपंपांच्या क्षेत्रात मागील अनेक वर्षे सातत्य ठेवून संशोधनात मोठे यश साध्य केले आहे. या संशोधनाच्या बळावर जगात सर्वप्रथम डीसी सोलर कृषिपंपाची निर्मिती केली. त्यासाठी लागणारे सोलर पॅनल, कंट्रोलर्स, पंप्स, स्क्रीन पाइप्स, केसिंग पाइप्स, फिल्टर्स आदी सर्व प्रणालीची जैन इरिगेशन स्वतःच निर्मिती करते. तसेच जैन इरिगेशनने देशातील नऊ राज्यांत १५ हजारपेक्षा अधिक सोलर कृषिपंप लावून कार्यान्वित केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...